Maheesh Theekshana IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मोईन अलीचे दणक्यात पुनरागमन, CSK साठी ठरला गेम चेंजर; RCBची समाधानकारक कामगिरी

विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली, परंतु मोईन अलीने ( २-२८) सामन्याला कलाटणी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 09:05 PM2022-05-04T21:05:52+5:302022-05-04T21:11:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Maheesh Theekshana gets three wickets in the 19th over, Mahipal Lomror played his hand for RCB, CSK need to chase 174  | Maheesh Theekshana IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मोईन अलीचे दणक्यात पुनरागमन, CSK साठी ठरला गेम चेंजर; RCBची समाधानकारक कामगिरी

Maheesh Theekshana IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मोईन अलीचे दणक्यात पुनरागमन, CSK साठी ठरला गेम चेंजर; RCBची समाधानकारक कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) कडवी टक्कर दिली. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली, परंतु मोईन अलीने ( २-२८) सामन्याला कलाटणी दिली. महिपाल लोम्रोर व रजत पाटिदार यांनी RCBचा डाव सावरला अन् समाधानकारक पल्ला गाठून दिला. महीशा थिक्सानाने ( Maheesh Theekshana) १९व्या षटकात तीन विकेट्स घेत RCBच्या धावांवर लगाम लावला. 

मागील सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या मुकेश चौधरीने डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात त्याने ६ धावा देताना CSK ला सकारात्मक सुरुवात करून दिली.विराट व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी त्यानंतर CSKच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली.  आयपीएल २०२२मधील विराट व फॅफने प्रथमच अर्धशतकी भागीदारी केली. आजच्या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या मोईन अलीने ( Moeen Ali) सामन्याला कलाटणी दिली. अलीने त्याच्या पहिल्याच षटकात फॅफची विकेट घेतली. २२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून फॅफ ३८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल ( ३) विराटकडून चुकीचा कॉल मिळाल्याने रन आऊट झाला. 

आता विराटवरच सर्व भिस्त होती, परंतु अली विश्रांती घेऊन पूर्णपणे चार्ज होऊन आलेला. त्याने टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या यष्टिंचा वेध घेऊन गेला. विराट ३३ चेंडूंत ३० धावांवर त्रिफळाचीत झाला. विराटने या खेळीत ३ चौकार व १ षटकार लगावला. त्याचा हा षटकार सुरेश रैनाचा विक्रम मोडणारा ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्मा ( ४२९ षटकार) अव्वल स्थानावर आहे आणि त्यानंतर विराट कोहली ( ३२६), सुरेश रैना ( ३२५) , महेंद्रसिंग धोनी  ( ३१० ) व शिखर धवन (२०८) असा क्रम येतो.


महिपाल लोम्रोर व रजत पाटिदार यांच्या ४४ धावांच्या भागीदारीने RCB ला आधार  दिला. ड्वेन प्रेटोरियसने १६व्या षटकात रजतला २१ धावांवर बाद केले. महिपाल चांगले फटके मारत होता आणि त्याचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja Injured) दुखापतग्रस्त झाला. १९व्या षटकात महिपालचे वादळ महीश थिक्सानाने रोखले. महिपाल २७ चेंडूंत ३ चौकार  व २ षटकार खेचून ४२ धावांवर माघारी परतला. थिक्सानाने त्या षटकात वनिंदू हसरंगा ( ०) व शाहबाज अहमद (  १)  यांची विकेट घेतली. थिक्सानाने ४ षटकांत २७ धावांत ३ बळी टिपले. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात १६ धावा केल्या आणि RCB ने ८ बाद १७३ धावा केल्या. कार्तिक १७ चेंडूंत २६ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Maheesh Theekshana gets three wickets in the 19th over, Mahipal Lomror played his hand for RCB, CSK need to chase 174 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.