Join us  

MS Dhoni vs Faf du Plessis IPL 2022, CSK vs RCB Live Updates : महेंद्रसिंग धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच झाला विक्रम, CSK चा स्टार खेळाडू परतल्याने RCBचं वाढलं टेंशन

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५वे पर्व आता अंतिम टप्प्याच्या दिशेने झुकतेय आणि त्यामुळे प्ले ऑफची चुरसही वाढतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 7:10 PM

Open in App

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५वे पर्व आता अंतिम टप्प्याच्या दिशेने झुकतेय आणि त्यामुळे प्ले ऑफची चुरसही वाढतेय... चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर असले तरी त्यांना अजूनही संधी आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) शर्यतीत कायम राहायचे आहे. त्यामुळे CSK vs RCB या सामन्यात दमदार खेळ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल सँटनरच्या जागेवर आज मोईन अलीचे संघात पुनरागमन झाले. RCBकडून आज खेळण्यासाठी दिनेश कार्तिक फिट आहे का, याची उत्सुकता होती आणि तो तंदुरुस्त आहे. ( पाहा IPL 2022 - RCB vs CSK सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड  ) 

चेन्नई सुपर किंग्सचा संघ - ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रेटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महिश थिक्साना ( Ruturaj Gaikwad, Devon Conway, Moeen Ali, Robin Uthappa, Ambati Rayudu, MS Dhoni(w/c), Ravindra Jadeja, Dwaine Pretorius, Simarjeet Singh, Mukesh Choudhary, Maheesh Theekshana)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल,  शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, महिपाल लोम्रोर, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड ( Faf du Plessis(c), Virat Kohli, Rajat Patidar, Glenn Maxwell, Shahbaz Ahmed, Dinesh Karthik(w), Mahipal Lomror, Wanindu Hasaranga, Harshal Patel, Mohammed Siraj, Josh Hazlewood ) 

आज पडणार विक्रमांचा पाऊस...

  • आजच्या सामन्यात विराट कोहलीने ५१ धावा केल्यास तो CSK विरुद्ध १००० धावांचा पल्ला गाठणारा दुसरा फलंदाज ठरेल. शिखर धवनने हा पराक्रम केला आहे.  
  • महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत CSK कडून १९९ आयपीएल सामने खेळले आहेत आणि आजचा त्याचा २०० वा सामना आहे. त्याने आयपीएलमधील एकूण २२९ पैकी ३० सामन्यांत रायझिंग पुणे जायंट्सचे प्रतिनिधित्व केले आहे.  

  • महेंद्रसिंग धोनीनेच्या नावावर ५९९४ धावा आहेत आणि त्याला ट्वेंटी-२०त कर्णधार म्हणून ६ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ६ धावा हव्या आहेत. कर्णधार म्हणून विराट कोहलीने ६४५१ धावा केल्या आहेत.  शिवाय धोनीने आज ४ षटकार खेचल्यास RCBविरुद्ध षटकारांचे अर्धशतक पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरेल.
  • रॉबिन उथप्पाने आज ५० धावा करताच तो ५००० धावांचा पल्ला ओलांडेल, तर १६ धावा करून ख्रिस गेलचा ४९६५ धावांचा विक्रम तो मोडेल. आज त्याने ५००० धावा पूर्ण केल्यास तो हा टप्पा गाठणारा सातवा फलंदाज ठरले. विराट कोहली ( ६४६९), शिखर धवन ( ६१५३), रोहित शर्मा ( ५७६६), डेव्हिड वॉर्नर ( ५७१३), सुरेश रैना (  ५५२८)  व एबी डिव्हिलियर्स ( ५१६२) हे आघाडीवर आहेत.   
  • दिनेश कार्तिकला ४०० चौकार पूर्ण करण्यासाठी आज दोन वेळा चेंडू सीमापार पाठवावा लागणार आहे आणि हा पराक्रम करणारा तो ९वा खेळाडू ठरेल. शिखर धवन ( ६९२), विराट कोहली ( ५६३), डेव्हिड वॉर्नर ( ५४२), रोहित शर्मा ( ५०८), सुरेश रैना ( ५०६), गौतम गंभीर ( ४९२), रॉबिन उथप्पा (  ४८१) व अजिंक्य रहाणे ( ४२८) हे आघाडीवर आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमहेंद्रसिंग धोनीएफ ड्यु प्लेसीस
Open in App