Join us  

IPL 2022 : TATA ने दिला हात BCCIची स्पॉन्सरशीपमध्ये रिकॉर्ड ब्रेक कमाई; IPLसाठी ९ तगड्या कंपनींची गुंतवणुक

IPL 2022 BCCI to earn 800 Crore - इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व भारतात खेळवणार असल्याने गुंतवणुकदार आकर्षित झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:08 AM

Open in App

IPL 2022 BCCI to earn 800 Crore - इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व भारतात खेळवणार असल्याने गुंतवणुकदार आकर्षित झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे पूर्ण IPL 2020 आणि IPL 2021चा दुसरा टप्पा यूएईत खेळवण्यात आला होता. पण, आता कोरोना परिस्थिती निवळत चालली आहे आणि IPL 2022च्या साखळी फेरीतील ७० लढती महाराष्ट्रात खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने IPL 2022 Schedule नुकतेच जाहीर केले आणि ७० पैकी ५५ सामने मुंबई-नवी मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहे. 

BCCI च्या या निर्णयाचा मोठा आर्थिक फायदा झालेला पाहायला मिळतोय. बीसीसीआयने आतापर्यंत IPL 2022च्या सेंट्रल स्पॉन्सरशीपमधून रिकॉर्ड ब्रेक ८०० कोटींची कमाई केली आहे. ही आयपीएलमधील सेंट्रल स्पॉन्सरशीपमधून मिळवलेली सर्वाधिक रक्कम आहे.

यंदाची आयपीएल ही TATA IPL म्हणून खेळविण्यात येणार आहे आणि टाटासह टायटल स्पॉन्सर म्हणून बीसीसीआयने आणखी दोघांशी करार केले आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत RuPay आणि Swiggy Instamart  या दोन नव्या डिल्सची घोषणा केली. आता आयपीएलसाठी बीसीसीआयने ९ टॉप ब्रँड्ससोबत डिल केले आहेत. Insidesports च्या माहितीनुसार RuPay ने ४२ कोटी आणि Swiggy Instamart ने ४४ कोटींचा प्रतीवर्ष करार केला आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआयने यंदा ८०० कोटींची स्पॉन्सरशीप डिल केली आहे. TATA ग्रुपने ३३५ कोटी टायटल स्पॉन्सरशीपसाठी दिले आहेत. VIVO ने ट्रान्सफर डिलनुसार ४४०कोटी दिले आहेत. बीसीसीआयने प्रथमच आयपीएलसाठी सहा ऑफिशियल स्पॉन्सर ठेवले आहेत. PayTM हे Official Partner आणि Ceat हे  Strategic Timeout Partner आहेत. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयटाटा
Open in App