IPL 2022 : आश्चर्यच...!; दक्षिण आफ्रिकेसाठी ५ महिने अनफिट असलेला Anrich Nortje मुंबईत दाखल झाला, DCला मोठा दिलासा मिळाला

दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एनरिच नॉर्खिया हा आयपीएल २०२२ साठी मुंबईत दाखल झाल्याने दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:28 PM2022-03-20T12:28:36+5:302022-03-20T12:29:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: Anrich Nortje reaches Mumbai to join Delhi Capitals ahead of IPL, Unfit for South Africa for last 5 months | IPL 2022 : आश्चर्यच...!; दक्षिण आफ्रिकेसाठी ५ महिने अनफिट असलेला Anrich Nortje मुंबईत दाखल झाला, DCला मोठा दिलासा मिळाला

IPL 2022 : आश्चर्यच...!; दक्षिण आफ्रिकेसाठी ५ महिने अनफिट असलेला Anrich Nortje मुंबईत दाखल झाला, DCला मोठा दिलासा मिळाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 : दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एनरिच नॉर्खिया ( Anrich Nortje ) हा आयपीएल २०२२ साठी मुंबईत दाखल झाल्याने दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. नॉर्खिया मागील पाच महिन्यांपासून दुखापतीमुळे राष्ट्रीय संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्या आयपीएल खेळण्यावरही अनिश्चितता होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही तो अजूनही तंदुरुस्त नसल्याचे सांगितल्याने दिल्ली कॅपिटल्सचे टेंशन वाढले होते. पण, त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का देताना दिल्ली कॅपिटल्सचा कॅम्प गाठला. पण, तरीही नॉर्खियाच्या खेळण्यावर अजूनही संभ्रम आहे. दिल्ली कॅपिटल्सची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे. 

नॉर्खिया पुर्णपणे तंदुरूस्त नसतानाही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्याला आयपीएल खेळण्यासाठी कशी परवानगी दिली, याचे उत्तरही गुलदस्त्यात आहे. नोव्हेंबर २०२१पासून नॉर्खियाने गोलंदाजीही केलेली नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या वैद्यकीय टीमने तंदुरुस्त जाहीर केल्यास तो आयपीएल खेळू शखतो. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२२मध्ये रिटने केलेल्या खेळाडूंपैकी नॉर्खिया हा एक होता आणि त्याला ६.५ कोटींत संघात कायम राखले गेले आहे.  भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला ही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला न्यूझीलंड आणि बांगलादेश संघांविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. 

नॉर्खियाच्या अनुपस्थितीत आता दिल्लीच्या गोलंदाजीची जबाबदारी शार्दूल ठाकूर व खलिल अहमदवर असणार आहे. २७ मार्चला दिल्ली पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे.  

 पृथ्वी शॉ BCCIच्या फिटनेस टेस्टमध्ये नापास
सलामीवीर पृथ्वी शॉ याला NCA मध्ये झालेली फिटनेस टेस्ट पास करता आली नाही.Yo-Yo Test पास होण्यासाठी १६.५ गुणांची कमाई करणे गरजेचे होते, परंतु पृथ्वीला १५ गुणच कमावता आले. त्यामुळेच त्याला घरच्या मैदानावरील भारतीय संघाच्या मालिकेत संधी मिळाली नाही. पृथ्वी शॉ हा बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंमध्ये नसल्याने तो आयपीएल २०२२ खेळू शकतो, परंतु त्याचा पुढील आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघात समावेश करण्याबद्दल विचार केला जाणार नाही.  पृथ्वीला आता दिल्ली कॅपिटल्सच्या फिटनेस चाचणीत यशस्वी व्हावे लागेल. डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएल २०२२साठी दाखल  होणार आहे. त्यामुळे दिल्लीची डोकेदुखी आणखी वाढली आहे.  

Web Title: IPL 2022: Anrich Nortje reaches Mumbai to join Delhi Capitals ahead of IPL, Unfit for South Africa for last 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.