Join us  

IPL 2021: चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा विस्फोट! फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांना लागण

IPL 2021: आयपीएलमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून आयपीएलशी संबंधित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 10:04 AM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून आयपीएलशी संबंधित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यात आज आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मायकल हसी यांना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नईच्या संघात याआधीच गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला होता. (IPL 2021: CSK batting coach Michael Hussey tests positive for COVID-19)

बायो-बबलच्या नियमांचा पालन करुनही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं (बीसीसीआय) खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचा निर्णय काल जाहीर केला. दरम्यान, स्पर्धा रद्द झाली असली तरी परदेशी खेळाडूंमध्ये मायदेशात परतण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात भारतातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे खेळाडूंमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. 

आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर कोलकाता विरुद्ध बंगलोरचा सामना रद्द करण्यात आला होता. त्यात चेन्नईच्या संघातही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यावर गंडांतर आलं होतं. अखेर बीसीसीआयनं स्पर्धा स्थगित करत असल्याचा निर्णय जाहीर केला. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सकोरोना वायरस बातम्या