Join us  

IPL 2021: पुजारा यशस्वी ठरणार की नाही ?

टेस्टमधील हा बेस्ट फलंदाज टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी होईल की नाही याबाबत चर्वितचर्वण सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 5:33 AM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल २०२१ मध्ये भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी आनंददायी वृत्त मिळाले. त्याला चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघात स्थान दिले. आता ज‌वळजवळ ७ वर्षांनंतर पुजारा आयपीएलच्या १४ व्या पर्वात या संघातर्फे खेळताना दिसेल. आता टेस्टमधील हा बेस्ट फलंदाज टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी होईल की नाही याबाबत चर्वितचर्वण सुरू आहे.आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला पुजाराचा स्ट्राईक रेट बघताना आयपीएलमध्ये तो कसोटी क्रिकेटप्रमाणे यशस्वी ठरेल किंवा नाही, याबाबत साशंकता आहे. ब्रेट ली म्हणाला, हे कसोटी नाही, तर टी-२० क्रिकेट आहे. येथे एक डाव ९० मिनिटांमध्ये संपतो.पुजाराबाबत बोलताना ब्रेट ली म्हणाला, तो एक शानदार क्रिकेटपटू आहे, यात कुठली शंका नाही. ज्यावेळी तो फलंदाजी करतो त्यावेळी त्याचे तंत्र व धैर्य याबाबत कुणी शंका उपस्थित करू शकत नाही. पण टी-२० मध्ये एक डाव म्हणजे २० षटके केवळ ९० मिनिटांमध्ये संपतात. या कालावधित फलंदाजांना वेगाने धावा वसूल कराव्या लागतात. 

दडपणाच्या स्थितीत तो वेगाने धावा फटकावू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होतो. कदाचित तो यात यशस्वी होईल. कारण अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो टायमिंगसह फटके मारण्यात यशस्वी ठरल्याचे आपण बघितले आहे. त्याच्याकडे धावा वसूल करण्यासाठी बरेच मैदानी फटके आहेत. पण टी-२० क्रिकेटमध्ये तो यात यशस्वी ठरेल का ?आयपीएल २०२१ मध्ये सीएसकेची सलामीचीे लढत १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी पुजाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तो सराव करीत असल्याचे दिसत होते. त्यात तो मोठे फटके खेळत असल्याचा दिसला. सीएसकेने यंदाच्या मोसमासाठी झालेल्या लिलावात पुजाराला त्याच्या बेस प्राईस ५० लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले. पुजारानेही हे म्हटले होते की, या मोसमात तो रोहित शर्मा व विराट कोहलीप्रमाणे चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तो यापूर्वी २०१४ मध्ये अखेरचे आयपीएलमध्ये खेळला होता. आता सहा वर्षांनंतर पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सचेतेश्वर पुजारा