Join us  

IPL 2021: केएल राहुल शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना मुकणार? मयांक अग्रवालनं दिलं उत्तर...

IPL 2021: पंजाब किंग्जचा सलामीवीर आणि सध्याचा कर्णधार मयांक अग्रवाल यानं केएल राहुलच्या पुनरागमनाबाबत विचारलं असता स्पष्ट उत्तर देणं टाळलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 5:43 PM

Open in App

IPL 2021: पंजाब किंग्जचा सलामीवीर आणि सध्याचा कर्णधार मयांक अग्रवाल यानं केएल राहुलच्या पुनरागमनाबाबत विचारलं असता स्पष्ट उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे केएल राहुल आता उर्वरित सामन्यांना मुकणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. पण केएल राहुल लवकरच बरा होऊन स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात संघात पुनरागमन करू शकेल, अशी शक्यता देखील अग्रवाल यानं व्यक्त केली आहे. (IPL 2021: Mayank Agarwal has his say on whether KL Rahul will miss the entire tournament )

IPL 2021: ऑस्ट्रेलियाच्या समालोचकानं IPL सोडून घेतला मालदिवचा आसरा? इतर खेळाडूही तयारीत!

पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला पोटादुखीच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. केएल राहुल याला अॅपेन्डिक्सचा त्रास असल्याचं काही चाचण्या केल्यानंत लक्षात आलं. त्यानंतर केएल राहुल याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यामुळे केएल राहुल येत्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. केएल राहुलवर शस्त्रक्रीया यशस्वी झाली असून तो क्वारंटाइन नियमांचं सध्या पालन करतो आहे. त्यानंतर तो संघात पुनरागमन करेल, असं संघाच्या व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

केएल राहुल पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार असून यंदाच्या सीझनमध्ये तो तुफान फॉर्मात आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलच्या जागी मयांक अग्रवाल यानं पंजाबचं नेतृत्व केलं. सामना झाल्यानंतर दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा यानं मयांक अग्रवाल याची छोटेखानी मुलाखत घेतली. यात रबाडानं केएल राहुल संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे का? असं अग्रवाल याला विचारलं. त्यावर अग्रवालनं नक्कीच नाही असं सांगत केएल राहुलच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली पण नेमकी तारीख सांगणं अशक्य असल्याचंही तो म्हणाला. 

"केएल राहुल स्पर्धेतून बाहेर गेलेला नाही. पण त्याची मला नक्कीच आठवण येतेय. अतिशय प्रांजळपणे सांगायचं झालं तर आम्हाला इथं येऊन संघासाठी खेळता आलं यासाठी आम्ही नक्कीच नशीबवान आहोत. सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण देश आणि जग मोठ्या अडचणीचा सामना करतंय. मी खरंच स्वत:ला नशीबवान समजतो", असं मयांक अग्रवाल म्हणाला. 

IPL 2021 : दोन खेळाडूंसह १० जणांना कोरोना; IPLच्या पुढील सामन्यांबाबत BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स!

दरम्यान, केएल राहुलवर शस्त्रक्रीया झाल्यानं त्याला सध्या आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तो पूर्वीप्रमाणं मैदानात उतरण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे केएल राहुल आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुलपंजाब किंग्समयांक अग्रवाल