Join us  

IPL 2021: 'शर्ट-लेस' डान्स अन् संगकाराचे मोलाचे शब्द; राजस्थानचं ड्रेसिंग रुममध्ये 'रॉयल' सेलिब्रेशन, पाहा Video

IPL 2021, Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचे दोन युवा गोलंदाज कार्तिक त्यागी आणि चेतन साकरिया यांनी ड्रेसिंग रुममध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या रोमहर्षक विजयाचं धमाल सेलिब्रेशन केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 4:40 PM

Open in App

IPL 2021, Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचे दोन युवा गोलंदाज कार्तिक त्यागी आणि चेतन साकरिया यांनी ड्रेसिंग रुममध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या रोमहर्षक विजयाचं धमाल सेलिब्रेशन केलं. दोघांनी टी-शर्ट काढून 'रॉयल' वॉक करत विजयाचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण ड्रेसिंग रुममध्ये यावेळी मजामस्ती आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. राजस्थान रॉयल्सचा ट्विटर हँडलवर या संपूर्ण सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. 

कोहलीला कर्णधारपदावरुन हटविण्याचा हालचाली?, संघ व्यवस्थापन नाराज

राजस्थान रॉयल्सनं काल दुबईच्या स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध विजयश्री खेचून आणली आणि जोरदार 'हल्लाबोल' केला. सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कार्तिक त्यागी या युवा वेगवान गोलंदाजानं राजस्थानला जिंकून दिलं. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी अवघ्या ४ धावांची गरज होती. हातात ८ विकेट्स असतानाही पंजाबला सामना जिंकता आला नाही. कार्तिक त्यानं दोन बळी घेतले आणि तीन निर्धाव चेंडू टाकले. केवळ एकच धाव त्यानं अखेरच्या षटकात दिली आणि सामना खिशात घातला. राजस्थानच्या या रोमहर्षक विजयाचं ड्रेसिंगरुममध्येही तितकच जबरदस्त सेलिब्रेशन झालेलं पाहायला मिळालं. 

राहुल-मयांकची 'गट्टी', पण जमेना संघाची 'भट्टी'; राजस्थाननं अशी केली पंजाबची 'छुट्टी'!

संघाचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा देखील संघातील खेळाडूंनी दाखवलेल्या चिकाटीवृत्तीचं कौतुक करताना या व्हिडिओमध्ये दिसतो. संघानं मिळवलेल्या आजच्या विजयाचं संपूर्ण श्रेय त्यानं सांघिक कामगिरी दिलं. तसंच पुढचे दोन दिवस खेळाडूंना आजच्या सामन्याबाबत एकमेकांशी बोलण्याची आणि आपण कुठं कमी पडतोय? काय सुधारता येईल? यावर चर्चा करण्याचं आवाहन केलं. मैदानात प्रत्यक्ष खेळत असलेल्या खेळाडूंनाच खऱ्या परिस्थितीचं ज्ञान असतं हे पटवून देताना त्यानं खेळाडूंना आजच्या निकालातून चांगल्या गोष्टी हेरण्याचं आवाहन केलं. 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्सकार्तिक त्यागी
Open in App