Join us  

IPL 2021 : 'सचिन, वीरू, लारा' यांनी CSKविरुद्ध झळकावलं वादळी अर्धशतक! 

IPL 2021 : १८८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असूनही पृथ्वीनं कोणतीच घाई किंवा चुकीचा फटका न मारता शांतपणे चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 6:14 PM

Open in App

IPL 2021 : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका पर्वात ८००+ ( ८२७) धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं आयपीएल २०२१तही फॉर्म कायम राखला. दिल्ली कॅपिटल्स संघाचे ( Delhi Capitals) प्रतिनिधित्व करताना पृथ्वीनं चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं ३८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ७२ धावा चोपल्या आणि शिखर धवनसह पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्याच्या या खेळीचं वीरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) अनोख्या पद्धतीनं कौतुक केलं.  शिखर धवनला बाद करण्यासाठी MS Dhoni चा 'मून' बॉलवर स्टम्पिंगचा प्रयत्न, Video

१८८ धावांचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) विजयाचा मजबूत पाया रचला. दिल्लीनं ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. सामन्यांच्या वेळेवरून महेंद्रसिंग धोनी नाराज; प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला बसतोय फटका  

दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी   माहेला जयवर्धने/वीरेंद्र सेहवाग - १५१ वि. मुंबई इंडियन्स, २०१३डेव्हिड वॉर्नर/वीरेंद्र सेहवाग - १४६ वि. पंजाब किंग्स, २०११पृथ्वी शॉ/ शिखर धवन - १३८ वि. चेन्नई सुपर किंग्स, २०२१  

वीरूनं ट्विट केलं की, आमच्यासाठी आजचा दिवस चांगला राहिला. ( A good day for us). वीरूनं पोस्ट केलेल्या फोटोत तो स्वतः, सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा दिसत आहेत.   याचा आणि पृथ्वी शॉच्या खेळीचा काय संबंध, असा प्रश्न सर्वांना नक्की पडला असेल. वीरूनं हे ट्विट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एका विधानावरून केलं आहे. शास्त्री यांनी पृथ्वीमध्ये सचिन, वीरू आणि लारा यांची छबी दिसते, असे म्हटले होते. २०१८मध्ये पृथ्वीनं पदार्पण केलं तेव्हा हे विधान केलं होतं.    

टॅग्स :आयपीएल २०२१पृथ्वी शॉचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सविरेंद्र सेहवाग