Join us  

IPL 2021: कोहलीनं टॉसवेळी घातला गोंधळ, संजू सॅमसन अन् समालोचक पाहातच राहिले; पाहा Video

IPL 2021: आयपीएलमध्ये आजच्या लढतीत नाणेफेकीवेळी विराट कोहलीकडून चूक घडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 7:32 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore)  यांच्यात लढत होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगलोरचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. तर राजस्थानच्या संघाला आजचा सामना जिंकून गुणतालिकेत आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी आहे. आजच्या सामन्याची नाणेफेक विराट कोहलीनं जिंकली खरी पण यावेळी एक गोंधळ पाहायला मिळाला. (IPL 2021 virat Kohli confusion during the toss in rcb vs rr match watch video)

आयपीएलचे फॅन आहात? मग सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे

सामन्याची नाणेफेक होत असताना दोन्ही संघांचे कर्णधार म्हणजेच विराट कोहली आणि संजू सॅमसन मैदानात उपस्थित होते. विराट कोहलीनं नाणेफेक केली आणि संजू सॅमसननं 'टेल्स' कॉल केला. हेड्स असा कौल मिळाल्यानं नाणेफेक कोहलीनं जिंकली. पण नाणेफेक जिंकूनही कोहलीनं संजू सॅमसनचं अभिनंदन केलं आणि त्याला निर्णय जाहीर करण्यासाठी पाचारण केलं. संजू सॅमसनलाही नेमकं कळेना की काय घडतंय? इतक्यात विराट कोहलीला त्याची चूक लक्षात आली आणि नाणेफेक त्यानं जिंकलीय हे ध्यानी येताच सॅमसनची क्षमा मागून त्यानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असल्याचं म्हटलं. या दरम्यान उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अगदी कोहलीनंही ''मला नाणेफेक जिंकण्याची सवय नाही'', असं म्हणत घडलेल्या घटनेवर प्रासंगिक विनोद केला. 

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं आजच्या सामन्यात एक मोठा बदल केला आहे. रजत पाटिदार याला संघाबाहेर ठेवून ऑस्ट्रेलियाचा आणखी एक धडाकेबाज खेळाडूला संधी दिली आहे. केन रिचर्डसन याला बंगलोरच्या संघात सामील करण्यात आलं आहे. तर राजस्थानच्या संघात श्रेयस गोपाल याचं पुनरागमन झालं आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सविराट कोहली