IPL 2021 चा धमाका! किती आहे टीव्हीवरील प्रेक्षकसंख्या?; खुद्द जय शाहंनीच सांगितला आकडा...

IPL 2021: संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) सुरू असलेल्या आयपीएलच्या १४ व्या पर्वानं टेलिव्हिजन विश्वात नवा रेकॉर्ड केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 04:05 PM2021-09-30T16:05:23+5:302021-09-30T16:07:18+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 on track to cross 400 million viewers on TV Data Shared by Star India | IPL 2021 चा धमाका! किती आहे टीव्हीवरील प्रेक्षकसंख्या?; खुद्द जय शाहंनीच सांगितला आकडा...

IPL 2021 चा धमाका! किती आहे टीव्हीवरील प्रेक्षकसंख्या?; खुद्द जय शाहंनीच सांगितला आकडा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) सुरू असलेल्या आयपीएलच्या १४ व्या पर्वानं टेलिव्हिजन विश्वात नवा रेकॉर्ड केला आहे. आयपीएलची लोकप्रियता ही तर सर्वांनाच माहित आहे. त्याचीच प्रचिती आता प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीत दिसून येत आहे. आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या स्टार इंडियानं टेलिव्हिजनवर आयपीएल पाहणाऱ्या प्रेक्षकांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात सलग चौथ्या वर्षी आयपीएलच्या टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांची संख्या ४०० मिलियनच्याही पुढे गेली आहे. (IPL 2021 on track to cross 400 million viewers on TV Data Shared by Star India)

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या (BARC) आकडेवारीनुसार आयपीएल २०२१ नं आतापर्यंत ३८० मिलियन प्रेक्षक संख्येचा आकडा पार केला आहे. ही आकडेवारी ३५ सामन्यांची आहे. आतापर्यंत ४३ सामने खेळविण्यात आले आहेत. तर प्ले-ऑफ आणि अंतिम फेरी होणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे या आकडेवारीत येत्या काळात आणखी वाढ होणार आहे. दरम्यान, आतापर्यंतची आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा जवळपास १.२ कोटींहून अधिक आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनीही याबाबत एक ट्विट करुन आयपीएलच्या लोकप्रियतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. "मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आयपीएल २०२१ ची प्रेक्षकसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ होताना पाहायला मिळत आहे. ३५ सामन्यांच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ३८० मिलियन प्रेक्षकांनी स्पर्धेचा टेलिव्हिजनवर आनंद घेतला आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा १.२ कोटींहून अधिक आहे. सर्वांचे मन:पूर्वक आभार. यापुढील स्पर्धा देखील याहून उत्कंठावर्धक असेल" असा विश्वास व्यक्त करणारं ट्विट जय शाह यांनी केलं आहे. 

आयपीएलच्या प्रेक्षकसंख्येमध्ये सातत्यानं वाढ
स्टार इंडियानं दिलेल्या माहितीनुसार २०१८ सालापासून टेलिव्हिजनवर आयपीएलचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ नोंदविण्यात आली आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये खंड पडला असला तरी प्रेक्षकसंख्येवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. याउलट प्रेक्षकसंख्या वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. यातच आयपीएलच्या लोकप्रियतेचं गमक दडलेलं असल्याचंही म्हटलं आहे. 

Web Title: IPL 2021 on track to cross 400 million viewers on TV Data Shared by Star India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.