Join us  

IPL 2021, BCCI Official Statement : आयपीएलमधील सर्व खेळाडूंना घरी परतण्याची BCCIनं दिली परवानगी, आता पुढे काय?

कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतर अखेर इंडियन प्रीमिअर लीगचा ( IPL 2021) १४ वा पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेतला गे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 2:37 PM

Open in App

कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतर अखेर इंडियन प्रीमिअर लीगचा ( IPL 2021) १४ वा पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल ( IPL chairman Brijesh Patel) यांनीही या वृत्ताला दुजोरा देताना सर्व खेळाडू व भागीदारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी BCCIची असेल, अशी ग्वाही दिली.  IPL 2021 News : उर्वरित स्पर्धा मुंबईत की थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर?; फ्रँचायझीमध्ये पडले दोन गट!

बीसीसीआयनं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात हा निर्णय गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत BCCIच्या प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत एकमतानं घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ''खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि या स्पर्धेशी संबंधित प्रत्येक व्यक्तिच्या सुरक्षिततेबाबत बीसीसीआय कोणतीच तडजोड करणार नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि भागीदारांचा विचार लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला आहे,''असे त्यात म्हटले आहे. 

''या कठीण प्रसंगी, विशेषतः भारतात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करण्याचा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण, आता ही स्पर्धा स्थगित करणे अत्यावश्यक आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबीयांकडे व प्रियजनांकडे जाऊ शकतात. बीसीसीआय या सर्वांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी संपूर्ण ताकदीनं प्रयत्न करेल.''

सनरायझर्स हैदराबादच्या वृद्घीमान सहा याचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला. तो विलगीकरणात आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रालाही कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. सोमवारी KKRचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स, CSKचे दोन सदस्य यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.  

आता पुढे काय?

खेळाडू आपापल्या घरी परतल्यानंतर यंदाच्या स्पर्धेचा उर्वरित टप्पा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतरच होईल आणि तोही यूएईत हे जवळपास पक्कं समजलं जात आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआय