Join us  

IPL 2021 : 'आता मागे हटायचं नाही!'; कोरोनानं बायो-बबल भेदल्यानंतरही फ्रँचायझी आयपीएल खेळवण्यावर ठाम!

इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2021) सुरक्षित बायो बबल अखेर कोरोना व्हायरसनं भेदला, तरीही ही स्पर्धा पूर्ण खेळवण्याचा प्रयत्न आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 11:15 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2021) सुरक्षित बायो बबल अखेर कोरोना व्हायरसनं भेदला, तरीही ही स्पर्धा पूर्ण खेळवण्याचा प्रयत्न आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे ( Kolkata Knight Riders ) दोन खेळाडू वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हा आला अन् सर्वांचे धाबे दणाणले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings ) तीन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचं ढग गोळा होऊ लागले. कोरोनाच्या या संकटामुळे परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, असं होऊनही फ्रँचायझींनी आता मागे हटायचं नाही ( there is no going back) असा पवित्रा घेतला आहे.

''स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि इथून माघारी फिरायचे नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील कोरोनाग्रस्त खेळाडूंच्या बातमीनं बीसीसीआयचं काम अधिक आव्हानात्मक केले आहे,''असे एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं PTIशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले,''त्या खेळाडूला बायो बबल बाहेर स्कॅनसाठी नेण्यात आले होते आणि तेथे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आम्हाला समजत आहे. बायो बबलच्या बाहेर असं होऊ शकतं. माझ्या माहितीनुसार बीसीसीआयच्या नियमांचं काटेकोर पालन होत आहे आणि तेथे कोणताच नियम मोडला जात नाही.'' दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून मोठी अपडेट्स, रहावं लागेल क्वारंटाईन!

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्येमुळे यापूर्वीच अॅडम झम्पा व केन रिचर्डसन या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतली होती. त्याआधी अँड्य्रू टाय व लायम लिव्हिंगस्टोन यांनीही बायो बबलला कंटाळून मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला होता. आर अश्विन यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूनं माघार घेतली. बीसीसीआयनं सर्व खेळाडूंच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आहे आणि जो पर्यंत प्रत्येक खेळाडू त्यांच्या घरी सुखरूप पोहोचत नाही, तोपर्यंत BCCIसाठी ही स्पर्धा संपलेली नसेल, अशी ग्वाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यांचे पुढील दोन दिवसाचे सामनेही होऊ शकतात स्थगित; समोर आलं मोठं कारण

अन्य फ्रँचायझींनी काही सूचना केल्या आहेत. त्यांच्यामते पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला अन्य खेळाडूंपासून दूर ठेवावे. मध्यांतरात आल्यानंतर स्पर्धा रद्द करणे शक्य नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. ''तुम्ही जरी स्पर्धा स्थगित केली, तर ती किती काळानंतर ती परत घ्याल?; त्यामुळे पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूला इतरांपासून दूर ठेवणे, हाच एक मार्ग आहे. त्यांना घरी कसे जाता येईल या काळजीनं खेळाडू आता अधिक चिंताग्रस्त झाले आहेत.'' बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी  

टॅग्स :आयपीएल २०२१कोरोना वायरस बातम्याबीसीसीआय