Join us  

IPL 2021 Suspended: भारत सोडताना भावूक झाले परदेशी खेळाडू; भारतीयांचे मानले आभार अन् सुरक्षित राहण्याचे आवाहन

बीसीसीआनं विविध क्रिकेट संघटनांशी चर्चा करून परदेशी खेळाडूंना माघारी पाठवण्यास सुरूवात केली आहे. मायदेशात परतण्यापूर्वी परदेशी खेळाडू भावूक झालेला पाहायला मिळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 3:19 PM

Open in App

IPL 2021 Suspended: इंडियन प्रीमिअर लीगचं १४वं पर्व स्थगित झालं. ४ मे २०२१ला बीसीसीआयनं हा निर्णय जाहीर केला अन् आधीच घाबरलेल्या परदेशी खेळाडूंना आता घरी जायचं कसं, असा सवाल पडला. बीसीसीआनं विविध क्रिकेट संघटनांशी चर्चा करून परदेशी खेळाडूंना माघारी पाठवण्यास सुरूवात केली आहे. मायदेशात परतण्यापूर्वी परदेशी खेळाडू भावूक झालेला पाहायला मिळत आहेत. डेव्हिड मिलर, फॅफ ड्यू प्लेसिस, कागिसो रबाडा, जॉस बटलर आणि अॅनरिच नॉर्ट्झे यांनी मायदेशात जाण्यापूर्वी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ( Foreign players like David Miller, Faf du Plessis, Kagiso Rabada, Jos Buttler, and Anrich Nortje posted a goodbye post for the fans before heading back home) राजस्थान रॉयल्सचा फलंदाज डेव्हिड मिलर यानंही PPE किट घालून व्हिडीओ पोस्ट केला आहे. जोस बटलरच्या ट्विटनं सर्वांना भावनिक केलं.     

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं दिले अपडेट्सरॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. RCBनं चार्टर्ड फ्लाईट्सची सोय केली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदिवला रवाना झाले असून न्यूझीलंडचे खेळाडू ऑकलंडला चार्टर्ड फ्लाईट्सनं रवाना झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मुंबई आणि दोहा मार्गे जोहान्सबर्गला जाणार आहेत.  

Royal Challengers Bangalore personnel return home.

Working with guidance from BCCI• All domestic players, staff &...

Posted by Royal Challengers Bangalore on Thursday, May 6, 2021

 

टॅग्स :आयपीएल २०२१जोस बटलरएफ ड्यु प्लेसीस