Join us  

IPL 2021 Suspended : लोकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीच तडजोड करायची नव्हती; बीसीसीआय सचिव जय शाह 

इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं मंगळवारी घेतला. त्यामुळे आता उर्वरित स्पर्धा केव्हा व कुठे, याची चाचपणी सुरू झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 3:05 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं मंगळवारी घेतला. त्यामुळे आता उर्वरित स्पर्धा केव्हा व कुठे, याची चाचपणी सुरू झाली आहे. देशातील कोरोना परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय वेळापत्रक लक्षात घेता उर्वरित स्पर्धा पुढील सहा महिनेतरी खेळवली जाईल, याची शक्यता कमीच आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू, सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी एक खेळाडू अन् चेन्नई सुपर किंग्सच्या सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य यांना कोरोना लागण झाल्यानंतर हा निर्णय येणे अपेक्षित होतेच. त्यामुळे या लीगमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची व संबंधित सर्व व्यक्तिंची सुरक्षा, हे आमचं प्राधान्य आहे, असे मत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी व्यक्त केले. आयपीएलमधील सर्व खेळाडूंना घरी परतण्याची BCCIनं दिली परवानगी, आता पुढे काय?

ANI शी बोलताना जय शाह यांनी सांगितले की,''देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसीलनं ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडू, स्पर्धेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, कर्मचारी, ग्राऊन्समन्स, सामनाधिकारी, प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत आम्हाला कोणतीच तडजोड करायची नाही.'' IPL 2021 News : उर्वरित स्पर्धा मुंबईत की थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर?; फ्रँचायझीमध्ये पडले दोन गट!

सनरायझर्स हैदराबादच्या वृद्घीमान सहा याचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला. तो विलगीकरणात आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रालाही कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. सोमवारी KKRचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स, CSKचे दोन सदस्य यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर दुसरा टप्पा?आता स्पर्धेचे उर्वरित ३० सामने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतरच होतील अशी चर्चा सुरू आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे, परंतु त्यावरही कोरोनाचं सावट आहे. ही स्पर्धा यूएईत खेळवण्याचा विचार आयसीसी करत आहे. तसे झाल्यास आयपीएल २०२१चा दुसरा टप्पाही यूएईत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआयजय शाह