IPL 2021, SRH vs RR Live Updates : डेव्हिड वॉर्नरला अखेर बाहेरचा रस्ता दाखवला, राजस्थानविरुद्ध हैदराबादनं तगडा खेळाडू उतरवला

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Updates : सनरायझर्स हैदराबादला ( SRH) आता आयपीएल २०२१मधील प्रत्येक सामन्यात हा विजय मिळवावाच लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:04 PM2021-09-27T19:04:25+5:302021-09-27T19:08:25+5:30

IPL 2021, SRH vs RR Live Updates : RR won the toss and decided to bat first against SRH, David Warner missed today match | IPL 2021, SRH vs RR Live Updates : डेव्हिड वॉर्नरला अखेर बाहेरचा रस्ता दाखवला, राजस्थानविरुद्ध हैदराबादनं तगडा खेळाडू उतरवला

IPL 2021, SRH vs RR Live Updates : डेव्हिड वॉर्नरला अखेर बाहेरचा रस्ता दाखवला, राजस्थानविरुद्ध हैदराबादनं तगडा खेळाडू उतरवला

Next

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Updates : सनरायझर्स हैदराबादला ( SRH) आता आयपीएल २०२१मधील प्रत्येक सामन्यात हा विजय मिळवावाच लागणार आहे. ९ सामन्यांत केवळ २ गुणांची कमाई करून ते तळाच्या स्थानावर आहेत आणि आज त्यांचा सामना राजस्थान रॉयल्स ( RR) सोबत होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा RRचा संघ ९ सामन्यांत ८ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी अधिकच्या संधी आहेत. असे असले तरी आजचा सामना हा दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. उभय संघ आतापर्यंत १४ वेळा आमनेसामने आलेत आणि त्यात प्रत्येकी ७-७ सामने त्यांनी जिंकले आहेत. 

 
दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी आज जेसन रॉय ( Jason Roy makes his SRH debut.) पदार्पण करणार आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. RRच्या संघात तीन बदल पाहायला मिळत आहेत. डेव्हिड मिलर, तब्रेझ शम्सी व कार्तिक त्यागी आजच्या सामन्याला मुकणार. ख्रिस मॉरिस, एव्हीन लुईस यांचे कमबॅक झाले आहे. 

सनरायझर्स हैदराबाद - जेसन रॉय, वृद्धीमान सहा, केन विलियम्सन, प्रियांक गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल,  अभिषेक शर्मा 

राजस्थान रॉयल्स - एव्हिन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, लिएम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोम्रोर, रियान पराग, राहुल टेवाटिया, ख्रिस मॉरिस, चेतन सकारीया, जयदेव उनाडकट, मुस्ताफिजूर रहमान ( Rajasthan Royals : Evin Lewis, Yashasvi Jaiswal, Sanju Samson(w/c), Liam Livingstone, Mahipal Lomror, Riyan Parag, Rahul Tewatia, Chris Morris, Chetan Sakariya, Jaydev Unadkat, Mustafizur Rahman) 

Web Title: IPL 2021, SRH vs RR Live Updates : RR won the toss and decided to bat first against SRH, David Warner missed today match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app