Join us  

IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : १७ पे खतरा!; शाहबाज अहमदनं RCBला गमावलेला सामना जिंकून दिला, SRHने ४७ धावांत गमावले ८ फलंदाज

ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates  chennai १ बाद ९६ अशा मजबूत स्थितीत असलेल्या हैदराबादचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 11:04 PM

Open in App

ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates chennai : तिसऱ्या षटकात विकेट मिळवूनही रॉयल चॅलेंजरस् बंगलोर संघाला सामन्यावर पकड घेता आली नाही. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना RCBच्या हातून सामना खेचला. पण, अर्धशतक करून वॉर्नर माघारी परतल्यानंतर मनीष पांडेच्या खांद्यावर जबाबदारी होती, परंतु १७व्या षटकात शाहबाज अहमदनं ( Shahbaz Ahmed) तीन विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंवरील दडपण वाढलं अन् RCBनं गमावलेला सामना जिंकला. IPL 2021 : SRH vs RCB  T20 Live Score Update

डेव्हिड वॉर्नर-मनीष पांडे यांची दमदार खेळी...वृद्धीमान सहाला पुन्हा एकदा अपयश आलं. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजनं SRHला पहिला धक्का दिला. सहा १ धावांवर ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पण, RCBला या संधीचा फायदा उचलता आला नाही. डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी सावध खेळ करताना SRHसाठी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना या दोघांनी संयमानं खेळ केला.  IPL 2021 : SRH vs RCB T20 Live Score Update

डेव्हिड वॉर्नरनं आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजां तिसरे स्थान पटकावले. विराट कोहली ५९४४ धावांसह अव्वल, तर सुरेश रैना ५४२२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरच्या खात्यात ५२९४* धावा झाल्या असून त्यानं रोहित शर्मा ( ५२९२) व शिखर धवन ( ५२८२) यांना मागे टाकले. ( David Warner now 3rd Leading Run Scorer in IPL) कायले जेमिन्सननं १४व्या षटकात वॉर्नरला बाद केले. वॉर्नरनं ३७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकासह ५४ धावा केल्या. मनीष पांडेसह त्यानं ६९ चेंडूंत ८३ धावा जोडल्या. SRH vs RCB T20 Match, SRH vs RCB Live Score, IPL 2021 SRH vs RCB, SRH vs RCB Live Match

१७व्या षटकात सेट फलंदाज फिरले माघारी अन्...विराट कोहलीचा हुकूमी एक्का असलेल्या युझवेंद्र चहलचे अपयश RCBची डोकेदुखी ठरत आहे. आजच्या सामन्यातही तो विकेट घेण्यात अपयशी ठरला. चहलनं ४ षटकांत २९ धावा दिल्या. SRHला अखेरच्या चार षटकांत विजयासाठी ३५ धावांची गरज होती. १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाहबाज अहमदनं SRHच्या जॉनी बेअरस्टोला ( १२) बाद केले. पुढच्याच चेंडूवर SRHचा सेट फलंदाज मनीष पांडेही ( ३८) बाद झाला. या दोन विकेटनं RCBच्या ताफ्यात चैतन्य निर्माण केलं. याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अहमदनं SRHला तिसरा धक्का देताना अब्दुल समदला शून्यावर माघारी पाठवले. त्यानंतर हैदराबादला कमबॅक करता आले नाही. त्यांना २० षटकांत ९ बाद १४३ धावांवर समाधान मानावे लागले. 

अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज असताना हर्षल पटेलनं तिसरा चेंडू नो बॉल फेकला अन् त्यावर राशिद खाननं चौकार मारला. त्यानंतर फ्री हिटवर धाव घेण्यात अपयशी ठरला. त्यात राशिदनं एक शॉर्ट धाव घेतली. त्यामुळे हैदराबादला १ चेंडूंत ८ धावांची गरज होती. 

पाच वर्षांनंतर ग्लेन मॅक्सवेलचं पहिलं अर्धशतकसंथ खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर बंगलोर ( Royal Challengers Bangalore) च्या तगड्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला लावला. पाच वर्षानंतर ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक झळकावलं. विराट ( ३३) माघारी परतल्यानंतर ग्लेनसह ३८ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. होल्डरनं त्या षटकात १ धाव देत विकेट घेतली. SRH vs RCB, SRH vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news 

टी नटराजनला रिप्लेस करून SRH कर्णधार वॉर्नरनं राशिद खानला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलावलं. त्याची ही ट्रिक यशस्वी ठरली. एबी डिव्हिलियर्स १ धाव करून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला उभ्या असलेल्या वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विजय शंकर व मनीष पांडे यांनी अफलातून झेल टिपले. राशिदनं १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. मॅक्सवेलनं ४१ चेंडूंत ५९ धावा केल्या ( ५ चौकार व ३ षटकार). आरसीबीला २० षटकांत ८ बाद १४९ धावा करता आल्या. IPL 2021 : SRH vs RCB  T20 Live Score Update 

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद