IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : पंजाब किंग्सनं विश्वविक्रमवीर गोलंदाजाला दिली संधी, सनरायझर्स हैदराबादची होणार कोंडी

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : सनरायझर्स हैदबादानं ( SRH) आता कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न पूर्ण होणारे नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 07:08 PM2021-09-25T19:08:11+5:302021-09-25T19:11:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : Nathan Ellis making debut for PBKS, Sunrisers Hyderabad ion the toss and field | IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : पंजाब किंग्सनं विश्वविक्रमवीर गोलंदाजाला दिली संधी, सनरायझर्स हैदराबादची होणार कोंडी

IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : पंजाब किंग्सनं विश्वविक्रमवीर गोलंदाजाला दिली संधी, सनरायझर्स हैदराबादची होणार कोंडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : सनरायझर्स हैदबादानं ( SRH) आता कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न पूर्ण होणारे नाहीत. पण, त्यांनी मिळवलेला प्रत्येक विजय अन्य संघाचं प्ले ऑफचं गणित बिघडवू शकतो. त्यामुळेच पंजाब किंग्स ( PBKS) आजच्या सामन्यात सावधतेनं उतरेल. हैदराबादविरुद्ध १७ पैकी ५ सामन्यांतच पंजाबला विजय मिळवता आला आहे, तर १२ पराभव पत्करावे लागले आहेत. पंजाबला प्ले ऑफच्या शर्यतीत राहायचे असेल तर त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील. आता ते ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत.

आर अश्विननं विक्रमाची नोंद करताच रिषभ पंतचे 'ते' ट्विट होतंय व्हायरल; काय लिहिलं होतं त्यात?

कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांची सलामी पंजाबसाठी उजवी ठरत आहे. मात्र, मधल्या फळीचे अपयश त्यांना महागडे ठरत आहे. राजस्थानविरुद्ध धडाकेबाज ख्रिस गेलला संघाबाहेर बसविण्याचा पंजाबचा निर्णय चुकीचा ठरला. त्यामुळे आता त्याला संघाबाहेर ठेवण्याची चूक पंजाब करणार नाही. या सामन्यात पंजाबनं विक्रमवीर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला उतरवले.

कोण आहे एलिस नॅथन? 
ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिस यानं बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या ट्वेंटी-२० सामन्यात हॅटट्रिक घेतली होती.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. एलिसनं २०व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर महमुदुल्लाह, मुस्ताफिजूर रहमान व महेदी हसन यांना बाद केले अन् विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-२० हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी ब्रेट ली ( वि. बांगलादेश, २००७) आणि अॅश्टन अॅगर ( वि. द. आफ्रिका, २०२०) यांनी अशी कामगिरी केली आहे. 

सनरायझर्स हैदराबादचा संघ - डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान सहा, केन विलियम्सन, मनिष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद ( Playing XI: David Warner, Wriddhiman Saha, Kane Williamson (C), Manish Pandey, Kedar Jadhav, Abdul Samad, Jason Holder, Rashid Khan, Bhuvneshwar Kumar, Sandeep Sharma, Khaleel Ahmed)

पंजाब किंग्सचा संघ - लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, अॅडम मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हूडा, नॅथन एलिस, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, हरप्रीत ब्रार, ए सिंग ( Punjab Kings XI: KL Rahul, M Agarwal, C Gayle, A Markram, N Pooran, D Hooda, N Ellis, R Bishnoi, M Shami, H Brar, A Singh) 
 

Web Title: IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : Nathan Ellis making debut for PBKS, Sunrisers Hyderabad ion the toss and field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.