IPL 2021, SRH vs CSK Live Updates : SRHनं डेव्हिड वॉर्नरला पुन्हा बाकावर बसवले, CSKनंही एक मोठा बदल केला

डेव्हिड वॉर्नरची अनुपस्थिती SRHला किती महागात पडेल, हे आजच्या सामन्यात खऱ्या अर्थानं कळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:04 PM2021-09-30T19:04:57+5:302021-09-30T19:07:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, SRH vs CSK Live Updates : CSK won the toss and decided to bowl first against SRH, know playing XI  | IPL 2021, SRH vs CSK Live Updates : SRHनं डेव्हिड वॉर्नरला पुन्हा बाकावर बसवले, CSKनंही एक मोठा बदल केला

IPL 2021, SRH vs CSK Live Updates : SRHनं डेव्हिड वॉर्नरला पुन्हा बाकावर बसवले, CSKनंही एक मोठा बदल केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज गुणतालिकेत टॉपवर असलेला चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि तळाला असलेला सनरायझर्स हैदराबाद ( SRH) यांच्यात सामना रंगत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSKनं १० सामन्यांत १६ गुणांची कमाई केली आहे, तर SRH १० सामन्यांत ४ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पण, SRHला अजूनही प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे आणि त्यासाठी त्यांना उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. आयपीएलमध्ये CSKvsSRH हे संघ १५ वेळा एकमेकांना भिडले आणि त्यात धोनीच्या संघानं ११वेळा बाजी मारली आहे. आजही CSKचे पारडे जड मानले जात आहे. चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला


चेन्नई सुपर किंग्सचा संघ - ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मोईन अली, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवूड

सनरायझर्स हैदराबादचा संघ - डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान सहा, केन विलियम्सन, मनिष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद 

Web Title: IPL 2021, SRH vs CSK Live Updates : CSK won the toss and decided to bowl first against SRH, know playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.