Join us  

IPL 2021: श्रेयस अय्यर होऊ शकतो भारतीय संघाचा कर्णधार; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

IPL 2021: ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas lyer) याच्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 3:22 PM

Open in App

IPL 2021: ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग (Brad Hogg) यांनी भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas lyer) याच्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. श्रेयस अय्यर भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो, असं विधान हॉग यांनी केलं आहे. 

आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकचा पराक्रम, धोनीला टाकलं मागे!, बनला सर्वोत्तम यष्टीरक्षक

ब्रॅड हॉग यांनी आपल्या यूट्यूब चॅलनवर संवाद साधताना श्रेयस अय्यरचं तोंडभरुन कौतुक केलं. दुखापतीवर मात करुन पहिल्याच सामन्या श्रेयस अय्यरनं आपल्या कामगिरीत कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. तो पूर्वीसारखाच आक्रमक पद्धतीनं खेळताना पाहायला मिळाला. त्याच्या फलंदाजी सातत्य आणि जबाबदारपणा दिसून येतो. त्यामुळे येत्या काळात तो भारतीय संघासाठी खूप मोठी कामगिरी करू शकतो, असं ब्रॅड हॉग म्हणाले. 

मोठी बातमी! बीसीसीआयचं आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना पत्र, केली महत्त्वाची सूचना

"श्रेयस अय्यरनं दुखापतीवर मात करुन पुनरागमन केलं आहे. पण टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात त्याची निवड होऊ शकली नाही. त्याचाही दबाव त्याच्यावर होता. तरीही त्यानं दमदार फलंदाजी केली आणि त्यानं घेतलेली पत्रकार परिषद पाहता तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो असं स्पष्ट दिसून येतं. त्यानं आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्यासाठीच्या प्रक्रियेवर खूप लक्ष केंद्रीत केलेलं दिसून येते. तो भविष्याचा विचार करत बसत नाही फक्त आपल्या दैनंदिन कामावरत त्याचा जास्त विश्वास आहे. हाच त्याचा गुण त्याला खूप पुढे घेऊन जाणारा ठरेल", असं ब्रॅड हॉग म्हणाले. 

हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा

श्रेयस अय्यरनं आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व केलं आहे. पण दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागलं होतं आणि ऋषभ पंत याच्याकडे संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. दुखापतीवर मात करुन अय्यरनं दमदार पुनरागमन केलं आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरनं मैदानात जम बसवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रेयसनं ४१ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी साकारली. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. 

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्स
Open in App