Join us  

IPL 2021: जर्सीवरील १८९ क्रमांकाचं रहस्य काय?, हेटमायरनं श्रेयस अय्यरला सांगितलं गुपीत 

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा विस्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर यानं त्याच्या जर्सीवरील १८९ क्रमांकामागचं रहस्य उलगडून सांगितलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:49 AM

Open in App

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा विस्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) यानं त्याच्या जर्सीवरील १८९ क्रमांकामागचं रहस्य उलगडून सांगितलं आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सोबतच्या चर्चेदरम्यान त्यानं आपल्या आयुष्यात १८९ या क्रमांकाचं किती महत्त्वाचं स्थान आहे याची माहिती दिली. हेटमायर याच्या क्रिकेट करिअरमधला १८९ हा सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या असल्याचं त्यानं सांगितलं आहे. (IPL 2021: Shimron Hetmyer reveals secret behind his jersey number 189 in chat with Shreyas Iyer)

आर अश्विनची विक्रमाला गवसणी अन् रिषभ पंतचे १७ सप्टेंबरचं ट्विट व्हायरल  

शनिवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि शिमरन हेटमायर दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. श्रेयस अय्यरनं सामन्यात ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी साकारली होती. तर हेटमायरनं १६ चेंडूत २८ धावा केल्या होत्या. यात हेटमायरनं ५ खणखणीत चौकार ठोकले होते. दिल्लीनं राजस्थानवर तब्बल ३३ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला होता. या विजयानंतर श्रेयस अय्यर आणि हेटमायर यांनी क्रिकेट लाइव्ह शोसाठी मुलाखत दिली. यावेळी श्रेयस अय्यर यानं शिमरन याला त्याच्या जर्सीवरील १८९ या क्रमांकामागचं रहस्य काय असा सवाल केला. त्यावेळी हेटमायरनं सविस्तर माहिती दिली. 

जे सुचिथ व संदीप शर्मा यांच्या अफलातून झेलनी पंजाब किंग्सची वाट लावली, Video 

"१८९ हा माझ्या आजवरच्या क्रिकेट करिअरमधील सर्वोच्च स्कोअर आहे. कसोटी क्रिकेटमधील तो स्कोअर नाही इतकं मला नक्की आठवतंय. पण वेस्ट इंडिजच्या स्थानिक क्रिकेटमध्ये मी हा स्कोअर केला होता इतकं पक्कं आठवतंय. पण खरं सांगायचं झालं तर तो सामना कोणता होता हे या क्षणाला खरंच आठवत नाही. फक्त मला १८९ धावा केल्या होत्या हे आठवतंय", अशी प्रांजळ कबुली हेटमायर यानं दिली. 

शिमरन हेटमायर यानं यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये एकूण ११२ धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राइक रेट तब्बल १९६.४९ इतका जबरदस्त राहिला आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्स
Open in App