Join us  

IPL 2021: टी-२० चा नंबर वन फलंदाज थोडक्यात वाचला अन् शिखर धवनच्या 'हार्ट अटॅक' रिअॅक्शननं हशा पिकला!

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात देखील धवनच्या एका व्हिडिओनं सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 11:07 AM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन सध्या तुफान फॉर्मात आहे. आतापर्यंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑरेंज कॅप देखील त्याच्याकडेच आहे. धवनची फलंदाजी पाहायला जितकी मजा येते तितकच त्याच्या हटके स्टाइलनंही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मग ती झेल टिपल्यानंतर मांडीवर थाप मारुन केलेलं गब्बर स्टाइल सेलिब्रेशन असो किंवा मग सहकारी खेळाडूंसोबत केलेलं हटके सेलिब्रेशन. 

कोरोना लढ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं भारताला केली लाख मोलाची मदत!

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात देखील धवनच्या एका व्हिडिओनं सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. आयसीसीच्या टी-२० फलंदाजंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला डेव्हिड मलान आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाकडून खेळतोय. कालच्या सामन्यात डेव्हिड मलान पायचीत होता होता थोडक्यात बचावला. यावेळी दिल्लीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते पण यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते शिखर धवनच्या प्रतिक्रियेनं.

IPL 2021चा मध्यांतर, दिल्ली कॅपिटल्स टॉपवर; जाणून घ्या प्ले ऑफच्या शर्यतीत कोण IN- कोण OUT!

डेव्हिड मलान पायचीत झाल्याची अपील दिल्लीच्या खेळाडूंनी केली होती. पण पंचांनी नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. मग शिखर धवननं रिव्ह्यूचा वापर केला. रिव्ह्यूमध्ये डेव्हिड मलान थोडक्यात बचावल्याचं स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर दिसलं. त्यानंतर शिखर धवनच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि देहबोली पाहण्यासारखी झाली होती. जणू एखाद्याला हृदयविकाराचा झटका आलाय अशा प्रकारचे हावभाव धवनने दिले.मग काय नेटिझन्सनं धवनची रिअॅक्शन टिपली आणि लागलीच ट्विटरवर धवन भाऊंचा व्हिडिओ व्हायरल झाला. 

पाहा व्हिडिओ:

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सशिखर धवनपंजाब किंग्स