Join us  

IPL 2021: शेल्डन जॅक्सनचं स्वप्न पूर्ण झालं, महेंद्रसिंग धोनीनं दिलं खास गिफ्ट!

IPL 2021: कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा युवा भारतीय क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सन याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 5:04 PM

Open in App

IPL 2021: कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा युवा भारतीय क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सन याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याला चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडून खास गिफ्ट मिळालं आहे. आपण ज्याला आदर्श मानतो अशा खेळाडूला भेटण्याची संधी आणि त्याच्याकडून आठवण म्हणून मिळालेल्या गिफ्टमुळे शेल्डन जॅक्सन खूप खुश झाला आहे. महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटच्या मैदानात तशी भारतीयांची मनं जिंकली आहेत. तशीच त्यानं मैदानाबाहेरही आपल्या नम्रतेनं आणि चाहत्यांना दिलेल्या प्रतिसादानं सर्वांच्या मनात आदर निर्माण केला आहे. 

T20 चा गेम मोठा, नाही बक्षिसांना तोटा! खेळा  Cricket Quiz व रोज जिंका आकर्षक बक्षिसे

सध्याचे युवा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याला भेटण्यासाठी फार उत्सुक असतात. त्याचं मार्गदर्शन मिळेल याची संधीच प्रत्येक खेळाडूला हवी असते. बुधवारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यानंतर कोलकाताचा यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सन यालाही धोनीला भेटण्याची संधी मिळाली. (IPL 2021: Sheldon Jackson gets his bat and keeping gloves autographed by MS Dhoni)

शेल्डन जॅक्सनला भेटल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं त्याला त्याच्या बॅटवर आणि विकेटकिंपिंग ग्लोजवर स्वाक्षरी करुन आठवण भेट दिली. धोनीच्या ऑटोग्राफमुळे शेल्डन खूप खूश झाला आहे. त्यानं धोनीसोबतचा क्षण त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. "एक असा क्षण की ज्याचं मी शब्दाद वर्णन करू शकत नाही", असं कॅप्शन शेल्डनं यानं धोनीसोबतच्या फोटोला दिलं आहे. 

आयपीएलमध्ये युवा क्रिकेपटूंनी महेंद्रसिंग धोनीची भेट घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भारताचे अनेक युवा क्रिकेटपटू धोनीच्या एका भेटीची आतुरतेने वाट पाहात असतात. अनेक खेळाडूंना धोनीचं मार्गदर्शन मिळावं त्यानं आपल्या खेळाची दखल घ्यावी असं वाटत असतं. गेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा शाहरुख खान यानंही सामन्यानंतर धोनीची भेट घेतली आणि त्याचं मार्गदर्शन घेतलं. धोनी देखील युवा क्रिकेटपटूंशी अगदी मनमोकळेपणानं गप्पा मारताना दिसतो. धोनीसोबतच्या चर्चेतून खूप सकारात्मकता निर्माण होते असं युवा क्रिकेटपटू सांगतात. राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन साकरिया यानंही चेन्नई विरुद्धच्या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीसोबत मैदानात खेळण्याची संधी मिळाली आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याची पोस्ट केली होती.  

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी