IPL 2021 : चेपॅाकवर चमकला शाहबाझ, आरसीबी ठरले जिगरबाज, गुणतालिकेत अव्वल स्थान

IPL 2021: आरसीबीला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर हैदराबादने १६ व्या षटकापर्यंत २ बाद ११५ अशी भक्कम वाटचाल केली होती. मात्र, १७ वे षटक निर्णायक ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:58 AM2021-04-15T06:58:14+5:302021-04-15T06:59:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Shahbaz shines on Chepauk, RCB becomes Jigarbaaz, tops table | IPL 2021 : चेपॅाकवर चमकला शाहबाझ, आरसीबी ठरले जिगरबाज, गुणतालिकेत अव्वल स्थान

IPL 2021 : चेपॅाकवर चमकला शाहबाझ, आरसीबी ठरले जिगरबाज, गुणतालिकेत अव्वल स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन

चेन्नई : ज्या चुका कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध केली, त्याच चुकांची पुनरावृत्ती सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध केली आणि त्यांना ६ धावांनी हातातील सामना गमवावा लागला. १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मजबूत स्थितीत असतानाही हैदराबादला ९ बाद १४३ धावाच करता आल्या. आरसीबीने सलग दुसरा विजय मिळवताना गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले.

आरसीबीला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर हैदराबादने १६ व्या षटकापर्यंत २ बाद ११५ अशी भक्कम वाटचाल केली होती. मात्र, १७ वे षटक निर्णायक ठरले. फिरकीपटू शाहबाझ अहमद याने केवळ एक धाव देताना ३ बळी घेत हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावले. खेळपट्टी संथ झाल्याने चेंडू बॅटवर नीट येत नव्हता. असे असतानाही हैदराबादने विनाकारण आक्रमक पवित्रा घेत हातातील सामना गमावला. त्यामुळे हैदराबादची २ बाद ११५ धावांवरून ९ बाद १४२ अशी घसरगुंडी झाली. हैदराबादने २७ धावांत ७ बळी गमावत आरसीबीला सामना अक्षरश: बहाल केला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे आक्रमक अर्धशतक हैदराबादच्या फलंदाजांमुळे व्यर्थ ठरले. 
त्याआधी, ग्लेन मॅक्ल्सवेलने प्रतिकूल परिस्थितीत झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने समाधानकारक मजल मारली.  मॅक्सवेलचा अपवाद वगळता आरसीबीच्या एकाही फलंदाजाला अपेक्षित खेळी करता आली नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अचूक टप्प्यावर सातत्याने मारा करत आरसीबीच्या आक्रमकांना जखडवून ठेवले. कोहलीने आक्रमणाची सर्व सूत्रे आपल्याकडे घेत दर्जा दाखवला. त्याला उपयुक्त साथ दिली ती मॅक्सवेलने. 
कोहली-मॅक्सवेल यांनी ४४ धावांची भागीदारी करत धावगतीला वेग दिला. दोघे खेळपट्टीवर असेपर्यंत आरसीबीला धावांचा डोंगर दिसत होता. परंतु, अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डरने कोहलीला बाद केले आणि काही चेंडूंच्या अंतरानेच राशिद खानने धोकादायक एबी डीव्हिलियर्सला चालते केले. यामुळे आरसीबीच्या धावगतीवर परिणाम झाला आणि त्यांची वाटचाल कमालीची मंदावली.  मॅक्सवेलने डेथ ओव्हर्समध्ये मॅक्सवेलने फटकेबाजी करत आरसीबीला दीडशेच्या जवळ नेले.
राशिद खानने फलंदाजांना आक्रमणाची संधीच दिली नाही. ४ षटकांत १८ धावा देत त्याने एबी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना माघारी धाडले. त्याचप्रमाणे, अनुभवी भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर यांनीही आरसीबीला धक्के दिले. सुरुवातीला काहीसा महागडा ठरलेल्या टी. नटराजनने डेथ ओव्हर्समध्ये शानदार पुनरागमन केले.

- २०१९ पासून चौथ्यांदा धावांचा पाठलाग करताना मोक्याच्या वेळी हैदराबादचा डाव घसरला आहे. दिल्ली, आरसीबी, पंजाब आणि आता पुन्हा आरसीबीविरुद्ध हैदराबादच्या फलंदाजांनी मोक्याच्यावेळी नांगी टाकली. 
- आरसीबीने चौथ्यांदा छोट्या धावसंख्येचा यशस्वी बचाव करण्याची कामगिरी केली. याआधी त्यांनी चेन्नईविरुद्ध २००८ साली १२६ धावा, २००९ साली राजस्थानविरुद्ध १३३ धावा आणि २००९ सालीच पंजाबविरुद्ध १४५ धावांचा यशस्वी बचाव केला होता.

- आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध सर्वाधिक ८३४ धावांचा महेंद्रसिंग धोनीचा विक्रम डेव्हिड वॉर्नरने मोडला
- ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलमध्ये त्याने अखेरचे अर्धशतक २०१६ च्या सत्रात झळकावले होते. त्याने ४० डावानंतर पहिले आयपीएल अर्धशतक झळकावले.

Web Title: IPL 2021: Shahbaz shines on Chepauk, RCB becomes Jigarbaaz, tops table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.