Join us  

IPL 2021, RR vs PBKS : युझवेंद्र चहलनं कळ काढली, पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुलनं बोलती बंद केली

यंदाच्या आयपीएलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं त्यांच्या संघाचं नाव पंजाब किंग्स असं करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही त्यांनी त्यांच्या जर्सीतही बदल केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 5:57 PM

Open in App

IPL 2021, RR vs PBKS : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals vs Punjab Kings) यांच्यातला सामन्या अत्यंत चुरशीचा झाला. लोकेश राहुल ( KL Rahul), दीपक हुडा ( Deepak Hooda) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle ) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्सनं ( PBKS) २२१ धावांचा डोंगर उभा केला. पण, राजस्थान रॉयल्सचा ( RR) नवा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) एकटा भिडला आणि ११९ धावांची खेळी करून कडवी टक्कर दिली. पंजाबनं हा सामना अवघ्या ४ धावांनी जिंकला. लोकेश राहुलनं ५० चेंडूंत ९१ धावा, दीपक हुडानं २८ चेंडूंत ६४ धावा आणि गेलनं ४० धावा केल्या. पंजाबनं ६ बाद २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात RRच्या संजू सॅमसननं ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकार खेचून ११९ धावांची खेळी केली, परंतु RRला ७ बाद २१७ धावांपर्यंत मजल मारता आली.  नाव बदललं, जर्सी बदलली, तरीही हा संघ हार्ट अटॅक देण्याचं काही थांबवत नाही; प्रीती झिंटा नाराज

युझवेंद्र चहलनं काढली कळ...यंदाच्या आयपीएलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं त्यांच्या संघाचं नाव पंजाब किंग्स असं करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही त्यांनी त्यांच्या जर्सीतही बदल केला. त्यावरून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) युझवेंद्र चहलनं त्यांची फिरकी घेतली. पंजाब किंग्सची ( PBKS) नवी जर्सी ही RCBसारखीच दिसतेय. RCB 2008च्या जर्सीची ती कॉपी असल्याचेही अनेकांनी मत व्यक्त केलं. आयपीएलच्या १४व्या पर्वात नवी जर्सीसह पहिलाच सामना खेळणाऱ्या पंजाब किंग्सची युझीनं फिरकी घेतली. त्यानं लोकेश राहुल व ख्रिस गेल यांचा व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं की,''RCBमध्ये तुमचं स्वागत आहे.'' संजू सॅमसन काय खेळला...! १९ चेंडूंत चोपल्या ९० धावा; विक्रमी शतकासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान यावर लोकेश राहुलनं प्रत्युत्तर दिलं. तो म्हणाला, ३० एप्रिलला तुमची अवे जर्सी घालून या.३० एप्रिलला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर असा सामना रंगणार आहे.    

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुलयुजवेंद्र चहलपंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर