Join us  

IPL 2021, RR Vs KKR T20 Live : वर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : आज सर्व पत्ते राजस्थान रॉयल्सच्या पारड्यात पडताना ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 8:37 PM

Open in App

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : आज सर्व पत्ते राजस्थान रॉयल्सच्या पारड्यात पडताना दिसत आहेत. नाणेफेकिचा कौल जिंकल्यानंतर संजू सॅमसननं कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. त्यांच्या फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही आणि त्यात कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) विचित्र पद्धतीनं बाद झाला.  IPL 2021 : RR Vs KKR T20 Live Score Update

राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिलं. सातत्यानं अपयशी ठरलेल्या सुभमन गिल ७ धावांवर जीवदान मिळालं. आयपीएल २०२१त पहिलाच सामना खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालनं त्याचा सोपा झेल सोडला. पण, त्याचा फायदा उचलण्यात गिल अपयशी ठरला. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जोस बटलरच्या डायरेक्ट हिटवर गिलला ( ११) धावबाद होऊन तंबूत जावं लागलं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये KKRला १ बाद २५ धावा करता आल्या. IPL 2021 latest news, RR Vs KKR IPL Matches

नितीश राणा व राहुल त्रिपाठी या जोडीनं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पंरतु चेतन सकारियानं स्लोव्हर चेंडूवर राणा ( २२) यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ९ षटकांच्या आत दोन विकेट्स गेल्यानंतर KKRनं सुनील नरीनला प्रमोशन दिलं आणि तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला व पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. KKRचा मंदावलेली धावांच गती वाढवण्यासाठी नरीनचं प्रमोशन झालं, परंतु जयदेव उनाडकटच्या स्लोव्हर बाऊन्सरवर पुल मारण्याचा प्रयत्न फसला. यशस्वी जैस्वालनं अफलातून झेल टिपला.RR Vs KKR IPL match 2021, RR Vs KKR T20 Match त्यानंतर आलेल्या कर्णधार इयॉन मॉर्गनला डायमंड डकवर बाद होऊन माघारी परतावे लागले. राहुल त्रिपाठीनं मारलेला सरळ फटका नॉन स्ट्रायकर मॉर्गनच्या बॅटला लागून अडला अन् हो-नाही- हो-नाही करता करता ख्रिस मॉरिसनं त्याला धावबाद केले. RR Vs KKR Live Score, IPL 2021 RR Vs KKR, RR Vs KKR Live Match

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्स