Join us  

IPL 2021 RR vs DC T20 Live Score Update: राजस्थानच्या संघात धाकड फलंदाजाचं पुनरागमन, दिल्लीनंही आणलं घातक अस्त्र; जाणून घ्या Playing XI

IPL 2021 RR vs DC T20 Live Score Update: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टी-२० सामन्याचे सर्व अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 7:00 PM

Open in App

IPL 2021: RR vs DC T20, Live Score Update: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) अशी लढत होतेय. सामन्याची नाणेफेक राजस्थान रॉयल्सनं जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. 

दोन्ही संघांमध्ये आज दोन बदल करण्यात आले आहेत. राजस्थानच्या संघात बेन स्टोक्सच्या जागी आज तडफदार फलंदाज डेव्हिड मिलर याचं पुनरागमन झालं आहे. तर श्रेयस गोपाल याला आराम देऊन जयदेव उनाडकट याचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे दिल्लीच्या संघातही मोठा बदल पाहायला मिळतो आहे. दिल्लीचा आघाडीचा गोलंदाज कगिसो रबाडा याचं संघात पुनरागमन झालं आहे. तर ललित यादव याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. 

राजस्थान रॉयल्स संघाला सलामीला पराभूत झाल्यानंतर आयपीएलमध्ये दुसऱ्या लढतीत आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध उतरला आहे. दुखापतग्रस्त बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत राजस्थानची भिस्त कर्णधार संजू सॅमसनच्या कामगिरीवरच आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीने सलामीला सीएसकेचा सात गडी राखून पराभव केला. रॉयल्सला मात्र सोमवारी पंजाब किंग्सच्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चार धावांनी पराभव पत्करावा लागला होता. ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी करणाऱ्या सॅमसनला अखेरच्या चेंडूवर पाच धावा काढता आल्या नाहीत.

स्टोक्स हा दुखापतग्रस्त झाल्यानं आयपीएलबाहेर पडला आहे. अशावेळी जोस बटलर, शिवम दुबे आणि रियान पराग यांच्यावर दडपण वाढणार आहे. हे सर्वजण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सलामी लढतीत गोलंदाजदेखील ढेपाळले. चेतन सकारियाचा अपवाद वगळता पंजाबच्या फलंदाजांवर कुणीही वर्चस्व गाजवू शकले नव्हते. त्यामुळे गोलंदाजी सुधारण्याचे आव्हान संघापुढे आहे. संघराजस्थान रॉयल्स:  (Rajasthan Royals)संजू सॅमसन (कर्णधार), शिवम दुबे, मनन वोहरा, राहुल तेवतिया, जोस बटलर, डेव्हिड मिलर, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, मिस्तफिजुर रेहमान, चेतन सकारियादिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)रिषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स, ललित यादव, आर.अश्विन, टॉम करन, कगिसो रबाडा, आवेश खान 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स