Join us  

IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रवींद्र जडेजानं होत्याचं नव्हतं केलं, महेंद्रसिंग धोनीच्या २००व्या सामन्यात CSKचा 'सुपर' विजय!

IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या आणि चेन्नईनं हा सामना ४५ धावांनी जिंकला. जडेजानं दोन विकेट्ससह चार झेलही टिपले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:35 PM

Open in App

IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : अखेरच्या सहा षटकांत धावांचा वेग मंदावूनही चेन्नई सुपर किंग्सनं २० षटकांत ९ बाद १८८ धावांपर्यंत मजल मारली. जोर बटलर मैदानावर असेपर्यंत राजस्थान रॉयल्सच्या विजयाच्या आशा कायम होत्या, परंतु रवींद्र जडेजानं एकाच षटकात होत्याचं नव्हतं केलं. त्यानंतर मोईन अलीनं ३ विकेट्स घेत चेन्नईचा विजय निश्चित केला. या विजयास चेन्नईनं गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचा हा २०० वा सामना होता आणि त्याला सहकाऱ्यांनी विजयी भेट दिली. 

IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight :

  • ऋतुराज गायकवाडचे अपयश हे चेन्नई सुपर किंग्सच्या मधल्या फळीवर दडपण निर्माण करणारे ठरत आहे. ऋतुराजला मागील तीन सामन्यांत ५, ५ व १० धावा करता आल्या.  ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai
  • फॅफ ड्यू प्लेसिस ( ३३) व मोईन अली ( २६) यांनी त्यांचा फॉर्म कायम राखताना छोटेखानी खेळी केल्या. अंबाती रायुडूचा फॉर्म परतलेला पाहायला मिळाला, त्यानं २७ धावा केल्या. सुरेश रैनाही १८ धावांवर माघारी परतल्या.
  • ऋतुराज वगळता आघाडीच्या पाच फलंदाजांनी चांगली कामगिरी करताना संघाचा पाया मजबूत केला, परंतु यापैकी एखादी जोडीही मोठी भागीदारी करण्यात यशस्वी ठरली असती तर चेन्नईसाठी आणखी चांगले झाले असते.CSK vs RR, CSK vs RR live score, IPL 2021
  • महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांच्याकडे सहा षटकं होती आणि आज धोनीचे षटकार पाहण्यासाठी चाहते आतूर होते. पण, त्यांची निराशा झाली. धोनी १८ व जडेजा ८ धावांवर बाद झाले. 
  • ड्वेन ब्राव्हो ( २०*) व सॅम कुरन ( १३) यांनी अखेरच्या षटकांत काही फटके मारताना चेन्नईची लाज वाचवली आणि त्यांना ९ बाद १८८ धावांवर समाधान मानावे लागले. चेतन सकारिया ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
  • जोस बटलर व मनन वोहरा यांच्याकडून अपेक्षित सुरुवात झाली खरी, परंतु सॅम कुरननं त्यांना रोखले. संजू सॅमसनच्या खेळीत सातत्याचा अभाव पुन्हा पाहायला मिळाली. टॉपवर असलेली संजूची गाडी आज दरीत कोसळली. दीपक चहरला आज काही करिष्मा करता आला नसला तरी सॅम कुरननं ती कसर भरून काढली.
  • शिवम दुबे घरच्या मैदानावर सुसाट सुटला अन् त्यानं जोसला साजेशी साथ दिली. पण, ४२ धावांची ही भागीदारी रवींद्र जडेजानं तोडली. जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात जडेजानं RRचा सेट फलंदाज दुबेलाही ( १७) पायचीत करून माघारी पाठवले. IPL 2021 latest news, CSK vs RR IPL Matches
  • ४८ चेंडूंत ९९ धावांची गरज असताना RRला कमबॅक करणं तितकं सोप नव्हतं. १५व्या षटकात मोईन अलीनं दोन धक्के दिले. त्याआधीच्या षटकात त्यानं डेव्हिड मिलरचा अडथळा दूर केला. इथेच RRचा पराभव निश्चित झाला. 
  • सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या आणि चेन्नईनं हा सामना ४५ धावांनी जिंकला. जडेजानं दोन विकेट्ससह चार झेलही टिपले.   

 

टॅग्स :आयपीएल ट्वेंटी-20 मॅच हायलाईट्सचेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजाराजस्थान रॉयल्सआयपीएल २०२१