Join us  

IPL 2021, RCB vs KKR Live: आरसीबीनं नाणेफेक जिंकली, एका परदेशी खेळाडूला बाहेर बसवलं अन् दिली भारतीय खेळाडूला संधी; KKR ची गोलंदाजी

IPL 2021, RCB vs KKR Live: आयपीएलमध्ये आज 'डबल हेडर' लढत होतेय. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) असा पहिला सामना होतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 3:08 PM

Open in App

IPL 2021, RCB vs KKR Live: आयपीएलमध्ये आज 'डबल हेडर' लढत होतेय. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) असा पहिला सामना होतोय. तर दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता वानखेडेवर दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध पंजाब किंग्ज (PBKS) असा रंगणार आहे. 

आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याची नाणेफेक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं जिंकली असून कोहलीनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं यंदाच्या आयपीएलची सुरुवात धमाकेदार केली असून दोन्ही सामने जिंकले आहेत. आज तिसरा सामना जिंकून विजयाची हॅट्ट्रीक साधण्याचा कोहली ब्रिगेडचा प्रयत्न असणार आहे. तर केकेआरनं गेल्या दोन सामन्यांमध्ये एका सामन्यात विजय प्राप्त केला आहे. आजचा सामना जिंकून गुणतालिकेत बढत मिळविण्यासाठी केकेआरचा प्रयत्न असेल.

कोहलीनं यावेळी संघात एक बदल केला आहे. आजच्या सामन्यात बंगळुरूचा संघ केवळ तीन परदेशी खेळाडूंसह उतरणार आहे. डॅनियल ख्रिश्चनला बाहेर बसवून आज रजत पाटिदार याला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स संघानं आज संघात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये खेळलेलाच संघ याही सामन्यात कायम ठेवला आहे. 

संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (royal challengers bangalore)विराट कोहली (कर्णधार) Virat Kohli (c), देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed), एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers (wk), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), रजत पाटिदार (Rajat Patidar), काइल जेमिन्सन (Kyle Jamieson), हर्षल पटेल (Harshal Patel), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

कोलकाता नाइट रायडर्स (kolkata knight riders)शुभमन गिल (Shubman Gill), नितीश राणा (Nitish Rana), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi), दिनेश कार्तिक Dinesh Karthik (wk), इऑन मार्गन (कर्णधार)  Eoin Morgan (c), आंद्रे रसेल (Andre Russell), शाकिब अल हसन, पॅट कमिन्स (Pat Cummins), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) 

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सविराट कोहली