Join us  

IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : मोहम्मद सिराजच्या एका निर्धाव चेंडूनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव निश्चित केला!

निराशाजनक सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) विरुद्धचा सामना जवळपास जिंकलाच होता. पण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:45 PM

Open in App

IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight : निराशाजनक सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) विरुद्धचा सामना जवळपास जिंकलाच होता. पण, अखेरच्या षटकात मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) टाकलेल्या एका निर्धाव चेंडूनं दिल्लीचा पराभव केला. नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या शिमरोन हेटमायरकडे वादळी खेळी करून विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलेल्या संघाला हरताना पाहण्यापलीकडे काहीच करण्यासारखे नव्हते. 

IPL 2021, RCB Vs DC T20 Match Highlight :

  •  रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सलामीवीरांनी पुन्हा मान टाकली. आवेश खान व इशांत शर्मा यांनी सुरुवातीला दिलेल्या धक्क्यानंतर RCBची मधली फळी सावध खेळ करताना दिसली. पण, त्यांनाही मोठी खेळी करता आली नाही. 
  • विराट कोहली ( १२) आणि देवदत्त पडीक्कल ( १७) माघारी परतले. अमित मिश्रानं RCBला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( २५)  माघारी जाण्यास भाग पाडले. 
  • एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी RCBचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांत ५४ धावांची भागीदारी केली. पाटिदार  २२ चेंडूंत २ षटकार मारून ३१ धावांवर माघारी परतला. 
  • एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या.  
  • प्रत्युत्तरात दिल्लीला झटपट धक्के बसले. धावफलकावर २३ धावा असताना शिखर धवन ( ६) माघारी परतला अन् त्यानंतर स्टीव्ह स्मिथ ( ४) माघारी परतला. त्यामुळे दिल्लीला २८ धावांत दोन धक्के बसले होते. खेळपट्टीवर तग धरून बसलेला पृथ्वी शॉ ८व्या षटकात माघारी परतला. 
  • मार्कस स्टॉयनिस व रिषभ यांनी फटकेबाजी करताना DCचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ३४ चेंडूंत ४५ धावा जोडल्या, परंतु हर्षलनं १३व्या षटकात स्टॉयनिसला ( २२) माघारी पाठवले. 
  • इथून दिल्लीसाठी शिमरोन हेटमायर किंवा रिषभ यांच्याकडून एबी डिव्हिलियर्ससारख्या फटकेबाजीची अपेक्षा होती. हेटमायरनं तसा खेळ केलाही. १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडिक्कलनं DCच्या हेटमायरचा झेल सोडला. तो कदाचित महागात पडला असला. 
  • अखेरच्या २४ चेंडूंत दिल्लीला विजयासाठी ५६ धावा हव्या होत्या.  १७व्या षटकात हेटमायरनं ३ षटकारांसह २१ धावा चोपून धावा व चेंडूंचं अंतर कमी केलं. हेटमायरनं २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. १९व्या षटकात ११ धावा आल्यानं दिल्लीला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. 
  • आता सर्व मदार मोहम्मद सिराजच्या खांद्यावर होती. सिराजनं पहिल्या तीन चेंडूंत फक्त दोनच धावा दिल्या. तिसरा चेंडू निर्धाव टाकला आणि तोच निर्णायक ठरला. 
  •  चौथ्या चेंडूवर दोन धावा आल्या अन् रिषभनं अर्धशतक पूर्ण केलं. पाचव्या चेंडूवर नशीबानं दिल्लीला एक चौकार मिळाला अन् अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज होती. पण, रिषभला चौकार मारता आला. 
  • शिमरोन २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. रिषभ ४८ चेंडूंत ५८ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं १ धावेनं सामना गमावला. त्यांना ४ बाद १७० धावांवर समाधान मानावे लागले. 
टॅग्स :आयपीएल ट्वेंटी-20 मॅच हायलाईट्सआयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्समोहम्मद सिराजरिषभ पंत