Join us  

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : मोहम्मद सिराजनं सामना फिरवला, दिल्ली कॅपिटल्सला एक धावेनं पराभव पत्करावा लागला

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:16 PM

Open in App

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळली होती. पण, दिल्ली कॅपिटल्सचे चार फलंदाज ४७ धावांत माघारी परतले होते. RCB सामन्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत विजयाच्या नजीक होते, परंतु हिमरोन हेटमायरनं सर्व गणित बिघडवले. त्यानं रिषभ पंतसह अर्धशतकी भागीदारीच केली नाही तर दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मात्र, अवघ्या एका धावेनं त्यांना हार मानावी लागली.  IPL 2021 : RCB Vs DC T20 Live Score Update

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ( Royal Challengers Banglore) साजेशी सुरुवात करता आली नाही. आवेश खाननं चौथ्या षटकात विराट कोहलीला ( १२) आणि इशांत शर्मानं पाचव्या षटकात देवदत्त पडीक्कलला ( १७) माघारी पाठवले. अमित मिश्रानं RCBला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( २५)  माघारी जाण्यास भाग पाडले. एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी RCBचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांत ५४ धावांची भागीदारी केली. पाटिदार  २२ चेंडूंत २ षटकार मारून ३१ धावांवर माघारी परतला. एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या.  IPL 2021, IPL 2021 latest news, RCB Vs DC IPL Matches

प्रत्युत्तरात दिल्लीला झटपट धक्के बसले. धावफलकावर २३ धावा असताना शिखर धवन ( ६) माघारी परतला अन् त्यानंतर स्टीव्ह स्मिथ ( ४) माघारी परतला. त्यामुळे दिल्लीला २८ धावांत दोन धक्के बसले होते. ७व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरनं दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याच्यासाठी LBWची अपील केली अन् मैदानावरील अम्पायरनी त्याला बाद ठरवले. पण, रिषभनं DRS घेतला तेव्हा चेंडू पॅडवर आदळण्यापूर्वी बॅटला लागला होता आणि त्यामुळे मैदानावरील अम्पायरना त्यांचा निर्णय बदलावा लागला. पण, खेळपट्टीवर तग धरून बसलेला पृथ्वी शॉ ८व्या षटकात माघारी परतला. हर्षल पटेलनं RCBला ही महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. वाईड जाणारा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी ( २१) बाद झाला. RCB Vs DC IPL Matches, RCB Vs DC IPL match 2021

मार्कस स्टॉयनिस व रिषभ यांनी फटकेबाजी करताना DCचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ३४ चेंडूंत ४५ धावा जोडल्या, परंतु हर्षलनं १३व्या षटकात स्टॉयनिसला ( २२) माघारी पाठवले. इथून दिल्लीसाठी शिमरोन हेटमायर किंवा रिषभ यांच्याकडून एबी डिव्हिलियर्ससारख्या फटकेबाजीची अपेक्षा होती. १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडिक्कलनं DCच्या हेटमायरचा झेल सोडला. अखेरच्या २४ चेंडूंत दिल्लीला विजयासाठी ५६ धावा हव्या होत्या.  १७व्या षटकात हेटमायरनं ३ षटकारांसह २१ धावा चोपून धावा व चेंडूंचं अंतर २५-१२ असं कमी केलं. त्या २१ धावांमुळे कायले जेमिन्सनच्या नावावर चार षटकांत ३२ धावा कुटल्या गेल्या. RCB Vs DC Live Score, IPL 2021 RCB Vs DC, RCB Vs DC Live Match

हेटमायरनं २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. १९व्या षटकात ११ धावा आल्यानं दिल्लीला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. हर्षल पटेलनं ३७ धावांत २ विकेट्स घेतल्या. आता सर्व मदार मोहम्मद सिराजच्या खांद्यावर होती. सिराजनं पहिल्या तीन चेंडूंत फक्त दोनच धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर दोन धावा आल्या अन् रिषभनं अर्धशतक पूर्ण केलं. पाचव्या चेंडूवर नशीबानं दिल्लीला एक चौकार मिळाला अन् अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज होती. पण, रिषभला चौकार मारता आला. शिमरोन २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. रिषभ ४८ चेंडूंत ५८ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं १ धावेनं सामना गमावला. त्यांना ४ बाद १७० धावांवर समाधान मानावे लागले.  

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर