Join us  

IPL 2021, RCB vs DC Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजांची कमाल, दिल्ली कॅपिटल्सच्या धावसंख्येला लावला लगाम

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं सलग दुसऱ्या पर्वात आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारली आहे.   RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि या निर्णयाबरोबरच त्यांच्या क्वालिफायर १ खेळण्याच्या आशा मावळल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 9:20 PM

Open in App

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Updates : प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं केलेल्या दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातला हा सामना औपचारिकच आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडू कोणतंही टेंशन न घेता खेळत होते. शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी दमदार फटकेबाजी केली, परंतु मधल्या फळीच्या अपयशानं DCला मोठी मजल मारता आली नाही. RCBच्या गोलंदाजांनी एलिमिनेटरपूर्वी चांगली गोलंदाजी केली. दिल्लीनं RCBसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. 

पृथ्वी शॉ  व शिखर धवन यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत ८८ धावा चोपल्या. दिल्लीनं क्वालिफायर १मध्ये आधीच स्थान पक्कं केल्यामुळे आज त्यांचे फलंदाज मनमोकळेपणाने खेळले. पृथ्वीची थंड पडलेली बॅट आज आग ओकताना दिसली. गब्बरही त्याला उत्तम साथ देत होता. ११व्या षटकात पर्पल कॅपचा विजेता हर्षल पटेल यानं RCBला पहिलं यश मिळवून दिलं. धवन ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात पृथ्वी ( ४८ धावा) ला चहलनं चालतं केलं. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या धावसंख्येवर लगाम लागली. 

कर्णधार रिषभ पंत ( १०) आज अपयशी ठरला. श्रेयस  अय्यनं खेळपट्टीवर टीकण्यासाठी पुरेसा वेळ घेतला, परंतु तो ( १८) मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. शिमरोन हेटमायरनं २९ धावा करत DC ला ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारून दिली. 

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स
Open in App