Join us  

IPL 2021 RCB vs CSK: MS Dhoniकडून आज हरला तर विराट कोहली 'कामा'तून जाणार; RCB कर्णधारपदावरून काढणार?

IPL 2021 RCB vs CSK : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा एकामागून एक धक्के देत चालला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 3:42 PM

Open in App
ठळक मुद्देचेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या २७ सामन्यांत RCBला फक्त ९ वेळा विजय मिळवता आला आहे, तर CSK नं १७ सामने जिंकलेत. १ सामना अनिर्णीत राहिलाय.

IPL 2021 RCB vs CSK : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा एकामागून एक धक्के देत चालला आहे. वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना त्यानं या स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर तीन दिवसांतच त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचेही यंदाच्या आयपीएलनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. विराटवर जबरदस्त दडपण असल्याचे या निर्णयांतून स्पष्ट होत आहे आणि त्याच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीच्या आवडत्या गोलंदाजाला किरॉन पोलार्डनं दिली खुन्नस, Video Viral

आज RCBचा संघा महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यात RCBला विजय मिळवण्यात अपयश आले तर ते संघासाठी टेंशन वाढवणारे ठरू शकते. त्यामुळे आज हरल्यास फ्रँचायझी विराटला कर्णधारपदावरून हटवेल, असे वृत्त काही इंग्रजी वेबसाईट्सनी दिले आहे. Is Virat Kohli to be removed as RCB captain mid-way? 

विराटनं जरी आयपीएल २०२१नंतर कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले असले तरी फ्रँचायझी त्याला हंगामाच्या मध्यंतरालाही डच्चू देऊ शकते.  IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात RCBला कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) ९२ धावांत गुंडाळले आणि ९ विकेट्स राखून विजय मिळवताना RCBमान शरमेनं खाली घालण्यास भाग पाडले. त्यामुळे फ्रँचायझी आधीच नाराज झाली आहे. गुणतक्त्यात RCB ८ सामन्यांनंतर १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण, आज CSKविरुद्ध हरल्यास त्यांच्या अडचणी पुढे वाढू शकतील.

IANS ला एका माजी क्रिकेटपटूनं सांगितले की,''KKRविरुद्ध ते कसे खेळले ते पाहा. कोणालाच काही समजेना. विराट सध्या मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळे मध्यंतरालाच त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्याची शक्यता आहे. अन्य संघांसोबतही असे घडले आहे. दिनेश कार्तिक ( KKR) व डेव्हिड वॉर्नर ( SRH) यांच्यासोबत असे फ्रँचायझींनी केले आहे. त्यांना एकतर हाकलले किंवा ते स्वतः पायउतार झाले. RCBच्या बाबतीतही असे घडू शकते. त्यामुळे आणखी एक लाजीरवाणा पराभव अन् विराटचे कर्णधारपद जाणे नक्की.'' 

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं विराटच्या निर्णयावर शंका उपस्थित केली. तो आयपीएल झाल्यानंतरही ही घोषणा करू शकला असता, असे मत गंभीरनं व्यक्त केले.''जर त्याला कर्णधारपद सोडायचेच होते, तर त्यानं स्पर्धा झाल्यानंतर तसं करायला हवं होतं. त्याच्या या निर्णयानं टीमला अस्वस्थ आणि भावनिक बनवले आहे,''असे गंभीर म्हणाला.  

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App