IPL 2021, Punjab kings: लागोपाठ ७ वेळा ‘प्ले ऑफ’पासून वंचित ! प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स अशी ओढवून घेतली नामुष्की

IPL 2021, Punjab kings: अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या मालकीचा पंजाब किंग्स संघ आयपीएल १४च्या पर्वात सहाव्या स्थानावर राहिला. सलग सात वेळा प्ले ऑफपासून वंचित होण्याचा नकोसा विक्रम या संघाच्या नावावर नोंदला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 05:37 AM2021-10-10T05:37:37+5:302021-10-10T05:37:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, Punjab kings: Deprived of 'play off' 7 times in a row! Preity Zinta's Punjab Kings was humiliated | IPL 2021, Punjab kings: लागोपाठ ७ वेळा ‘प्ले ऑफ’पासून वंचित ! प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स अशी ओढवून घेतली नामुष्की

IPL 2021, Punjab kings: लागोपाठ ७ वेळा ‘प्ले ऑफ’पासून वंचित ! प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स अशी ओढवून घेतली नामुष्की

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या मालकीचा पंजाब किंग्स संघ आयपीएल १४च्या पर्वात सहाव्या स्थानावर राहिला. सलग सात वेळा प्ले ऑफपासून वंचित होण्याचा नकोसा विक्रम या संघाच्या नावावर नोंदला गेला. याआधी सहा वेळा प्ले ऑफपासून दूर राहण्याची नामुष्की दिल्ली संघाला झेलावी लागली होती. (The Punjab Kings, owned by actress Preity Zinta, finished sixth in the IPL 14.  holds the record for being deprived of a play-off seven times in a row)

राहुलचा संघ ६ व्या स्थानी

लोकेश राहुलच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने यंदा सहाव्या स्थानी समाधान मानले. सलग सातव्यांदा हा संघ बाद फेरीपासून दूर राहिला. २०२१ मध्ये पंजाबने १४ सामने खेळले. त्यातील केवळ सहा सामने जिंकले.

२०१४ चा उपविजेता
पंजाबने २०१४ साली अखेरचे उपविजेतेपद पटकविले होते. त्यावेळी हा संघ अंतिम सामना खेळला होता. तेव्हापासून सलग सात पर्वांत संघाला विशेष काही करता आलेले नाही.

दिल्लीला टाकले मागे
पंजाबने ही नामुष्की ओढवून घेत दिल्लीला मागे टाकले. दिल्ली संघाने २०१३ ते २०१८ या दरम्यान आयपीएलमध्ये एकदाही प्ले ऑफ गाठले नव्हते. २०१९ आणि २०२० ला मात्र दिल्लीने जोरदार मुसंडी मारताना प्लेऑफमध्ये धडक दिली होती. मागच्या प्रहरात दिल्ली अंतिम सामन्यात मुंबईकडून पराभूत झाल्याने उपविजेता होता. यंदा दिल्लीने दहा सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल राहण्याचा मान मिळविला.

दिल्ली, पंजाब, बंगलोर जेतेपदाच्या प्रतीक्षेत
दिल्ली, पंजाब, बंगलोर हे आयपीएलमधील असे संघ आहेत की, ज्यांना पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. यंदा दिल्ली आणि बंगलोर यांनी प्ले ऑफ गाठले आहे. आरसीबी तिसऱ्या स्थानी आहे. आता आयपीएलला नवा चॅम्पियन मिळतो की पुन्हा एकदा चेन्नई आणि कोलकाता यांपैकी एक संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: IPL 2021, Punjab kings: Deprived of 'play off' 7 times in a row! Preity Zinta's Punjab Kings was humiliated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.