Join us  

IPL 2021: पृथ्वी शॉच्या 'थ्रो'नं रिषभ पंत घाबरला, डोक्यावर हात धरुन खालीच बसला!, पाहा VIDEO

IPL 2021: आयपीएल म्हटलं की मनोरंजन आणि थराराक सामन्यांची मेजवानी. यंदाच्या सीझनमध्येही अखेरच्या चेंडूपर्यंत रंगणारे अंगावर काटा आणणारे सामने पाहायला मिळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 11:55 AM

Open in App

IPL 2021: आयपीएल म्हटलं की मनोरंजन आणि थराराक सामन्यांची मेजवानी. यंदाच्या सीझनमध्येही अखेरच्या चेंडूपर्यंत रंगणारे अंगावर काटा आणणारे सामने पाहायला मिळत आहेत. त्यात मैदानात काही अनोखे प्रसंग देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. असाच एक प्रसंग कालच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात पाहायला मिळाला. (IPL 2021 Prithvi Shaw scares Rishabh Pant with a wayward throw in the match between DC and PBKS)

IPL 2021: टी-२० चा नंबर वन फलंदाज थोडक्यात वाचला अन् शिखर धवनच्या 'हार्ट अटॅक' रिअॅक्शननं हशा पिकला!

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पृथ्वी शॉ सध्या दमदार फॉर्मात आहे. कोलकाता नाइट रायडर्स  संघाविरुद्ध अवघ्या १८ चेंडूत शॉनं अर्थशतक ठोकलं होतं. तर कालच्या पंजाब विरुद्धच्या सामन्यातही शॉनं २२ चेंडूत ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. पण पृथ्वी शॉ जसा मैदानात आक्रमकपणे फलंदाजी करतोय तसाच तो क्षेत्ररक्षणातही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या पृथ्वी शॉ यानं इतका जोरात चेंडू थ्रो केला की यष्टीरक्षक पृथ्वी शॉ देखील घाबरला आणि डोक्यावर हात धरुन खालीच बसला. शॉनं केलेला थ्रो इतका आक्रमक होता की चेंडू रिषभ पंतच्या डोक्यावरुन गेला आणि पंतच्या पलिकडच्या खेळाडूनं चेंडू टिपला. 

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सनं कालच्या सामन्यात पंजाब किंग्जवर ७ विकेट्सनं विजय प्राप्त केला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. मयांक अग्रवालच्या नाबाद ९९ धावांच्या खेळीवर शिखर धवनच्या नाबाद ६९ धावा भारी पडल्या. पंजाबकडून मयांक एकटा खेळला, तर धवनला पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ या सहकाऱ्यांची साथ मिळाली. म्हणून दिल्लीनं हा विजय मिळवला.  

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सपृथ्वी शॉरिषभ पंत