Join us  

IPL 2021, PK Vs RCB T20 Live : पंजाब किंग्सचा सलामीवीराला दुखापत, ख्रिस गेल सलामीला येण्याची शक्यता 

आयपीएल २०२१मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्ससमोर ( Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे ( Royal Challengers Banglore) तगडे आव्हान असणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 7:06 PM

Open in App

ipl 2021 t20 PK Vs RCB live match score updates Ahmedabad : आयपीएल २०२१मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्ससमोर ( Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे ( Royal Challengers Banglore) तगडे आव्हान असणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी मैदानावर उतरतील. सहा सामन्यांत पाच विजयांसह RCB तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर PBKSला सहापैकी दोनच सामने जिंकता आले आहेत. यापुढे होणारा प्रत्येक पराभव हा त्यांना स्पर्धेबाहेर जाणाऱ्या मार्गाच्या नजीक नेणारा ठरणार आहे. विराटनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.  IPL 2021 : PK Vs RCB T20 Live Score Update

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या जलदगती गोलंदाजांनी यंदाच्या पर्वात सर्वाधिक ३१ विकेट्स घेतल्या आहेत.  पंजाबनं मागील दोन सामन्यांत बँगलोरवर विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात बँगलोरनं शाहबाज अहमदला संघात घेतले आहे, त्याच्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला विश्रांती देण्यात आली आहे. पंजाबच्या संघात मोईजेस हेन्रीक्स, मयांक अग्रवाल व अर्षदीप सिंग यांना आजच्या सामन्यात मुकावे लागणार आहे. त्यामुळे ख्रिस गेल व लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे, ( Chris Gayle and KL Rahul to open tonight for Punjab Kings as Mayank Agarwal misses out.) 

पंजाब किंग्स - लोकेश राहुल, प्रभसिमरन सिंग, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, हरप्रीत ब्रार, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, रिली मेरेडीथ (  Punjab Kings: 1 KL Rahul (capt & wk), 2 Prabhsimran Singh, 3 Chris Gayle, 4 Deepak Hooda, 5 Nicholas Pooran, 6 Shahrukh Khan, 7 Chris Jordan, 8 Harpreet Brar, 9 Ravi Bishnoi, 10 Mohammed Shami, 11 Riley Meredith)

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर - विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, कायले जेमिन्सन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल ( Royal Challengers Bangalore: 1 Virat Kohli (capt), 2 Devdutt Padikkal, 3 Rajat Patidar, 4 Glenn Maxwell, 5 AB de Villiers, 6 Shahbaz Ahmed, 7 Kyle Jamieson, 8 Daniel Sams, 9 Harshal Patel, 10 Mohammed Siraj, 11 Yuzvendra Chahal) 

टॅग्स :आयपीएल २०२१पंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर