Join us  

IPL 2021: पंजाबनं त्याच्यावर पाण्यासारखा पैसा ओतला, पण ४ सामन्यांत ३ वेळा झाला शून्यावर बाद!

IPL 2021, Nicholas Pooran: आयपीएलमध्ये यंदा पंजाबच्या संघानं नावात बदल केला. जर्सी बदलली. पण संघाचा खेळ काही बदलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 6:13 PM

Open in App

IPL 2021, Nicholas Pooran: आयपीएलमध्ये यंदा पंजाबच्या संघानं नावात बदल केला. जर्सी बदलली. पण संघाचा खेळ काही बदलेला नाही. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाचा गेल्या तीन सामन्यांमध्ये दोन सामन्यांत पराभव झाला आहे. तर आजच्या चौथ्या सामन्यातही पंजाबची बिकट अवस्था झाली आहे. याच दरम्यान संघाचा एक फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे. 

Golden, Silver अन् Diamond... निकोलस पूरनच्या नावे लाजीरवाणा विक्रम; जाणून घ्या काय आहे भानगड!

धडाकेबाज फलंदाजीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडविण्यासाठी वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन (Nicholas Pooaran) याची ओळख आहे. पण आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये पुनरच्या बॅटला काही सुर गवसताना दिसत नाहीय. २५ वर्षीय निकोलस पूरन याला गेल्या वर्षीपासून पंबाज किंग्ज संघासोबत आहे. त्याच्यावर ४ कोटी २० लाख रुपयांची बोली लावून पंजाबच्या संघानं आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं होतं. पण यंदाच्या सीझनमध्ये पंजाबचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहेत. 

लोकेश राहुल पाकिस्तानच्या बाबर आजमला पुरुन उरला; मोठा पराक्रम केला!

निकोलस पूरन यानं गेल्या चार सामन्यांमध्ये केवळ ९ धावा केल्या आहेत. लाजिरवाणी गोष्ट अशी की यातील तीन सामन्यांमध्ये पूरन आपलं खातं देखील उघडू शकला नाहीय. यंदाच्या सीझनमध्ये पंजाबचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळविण्यात आला होता. यात पूरन पहिल्याच चेंडूत बाद झाला होता. ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर चेतन साकरिया यानं पूरचा अप्रतिम झेल टिपला होता. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात दिपक चाहर यानं निकोलस पूरन याला शून्यावर माघारी पाठवलं होतं. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्यानं यंदाच्या आयपीएलमधील पहिली धाव घेतली. याही सामन्यात तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आवेश खान यानं निकोलस याला ९ धावांवर बाद केलं. सनरायझर्स विरुद्धच्या आजच्या सामन्यात निकोलस पूरन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण तो एकही चेंडू न खेळता डेव्हिड वॉर्नरच्या जबरदस्त डायरेक्ट हीटवर धावचीत झाला.  

टॅग्स :आयपीएल २०२१पंजाब किंग्स