Join us  

IPL 2021: नेटिझन्सनी पकडलं स्पिनर स्टार हरप्रीत ब्रार आणि पॉर्न स्टार यांच्यातील कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण?

आयपीएलदरम्यान सोशल मीडियावर पाऊस पडतो तो मीम्सचा. कधी कोणता खेळाडू चमकेल हे जसे सांगता येत नाही, तसेच नेटिझन्स कधी कोणावर मीम्स करुन धुमाकूळ घालतील हेही सांगता येत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 3:23 PM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयपीएलदरम्यान सोशल मीडियावर पाऊस पडतो तो मीम्सचा. कधी कोणता खेळाडू चमकेल हे जसे सांगता येत नाही, तसेच नेटिझन्स कधी कोणावर मीम्स करुन धुमाकूळ घालतील हेही सांगता येत नाही. यंदाच्या आयपीएलमध्येही असेच पाहण्यास मिळत आहे. पंजाब किंग्सचा फिरकीपटू हरप्रीत ब्रारने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध एकहाती सामना फिरवताना लक्षवेधी कामगिरी केली होती. मात्र, आता हाच हरप्रीत नेटिझन्सच्या रडारवर आलाय ते एका पॉर्न स्टारला मेसेज केल्यामुळे....

IPL 2021: कोरोनानं 'बायो-बबल' कसं भेदलं? कारण कळालं, सर्वच झाले हैराण!

जेव्हा कधी एखादा नवखा खेळाडू चमकतो, तेव्हा लगेच त्याची कुंडली काढण्याची धडपड नेटिझन्समध्ये लागते. त्यामुळे अनेकदा अशी माहिती हाती मिळते ज्यामुळे तो खेळाडू कधी कधी जाळ्यात अडकतो. हरप्रीतही आता अशाच जाळ्यात अडकला आहे. त्यामुळेच नेटिझन्स हरप्रीतला जबरदस्त ट्रोल करत आहेत.

IPL 2021: कोरोनानं IPLचं बायो-बबल भेदलं! KKR स्पर्धेतून 'आऊट' की आयपीएल स्पर्धाच रद्द?, BCCI पेचात

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांना ७ चेंडूंमध्ये बाद करत सर्वांच्या चर्चेत आलेल्या हरप्रीतचे जुने ट्वीट नेटिझन्सच्या हाती लागले आणि ते जबरदस्त व्हायरलही झाले. या ट्वीटची इतकी चर्चा होत आहे ते पॉर्न स्टार मिया खलिफामुळे. हरप्रीतने या ट्वीटमध्ये मियाला १४ फेब्रुवारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळेच आता नेटिझन्स प्रश्न विचारत आहेत की, या दोन ‘स्टार्स’मध्ये काही कनेक्शन आहे का’ त्याचवेळी, अनेकांनी या ट्वीटवर मीम्सही बनवले असून हरप्रीतला जबरदस्त ट्रोलही केले आहे. आयपीएलच्या २६व्या सामन्यात पंजाबने आरसीबीला ३४ धावांनी नमवले होते. यामध्ये हरप्रीतने तीन दिग्गजांना बाद करत पंजाबच्या विजयात निर्णायक कामगिरी केली होती. हरप्रीतच्या या कामगिरीनंतर क्रिकेटविश्वातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले होते

टॅग्स :आयपीएल २०२१पंजाब किंग्स