IPL 2021: मोहम्मद शमीला येतोय एका गोष्टीचा प्रचंड राग, स्पष्टच बोलून दाखवलं!

PL 2021: मोहम्मद शमीला सध्या एका गोष्टीचा प्रचंड राग येतोय. त्याबद्दल त्यानं आता उघडपणे आपली नाराजी व्यक्त करुन दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:47 PM2021-09-27T17:47:10+5:302021-09-27T17:47:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Mohammed shami said bio bubble can be irritating and players get mentally disturbed | IPL 2021: मोहम्मद शमीला येतोय एका गोष्टीचा प्रचंड राग, स्पष्टच बोलून दाखवलं!

IPL 2021: मोहम्मद शमीला येतोय एका गोष्टीचा प्रचंड राग, स्पष्टच बोलून दाखवलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: यूएईमध्ये आयपीएलच्या १४ व्या सीझनचा दुसरा टप्पा सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या यंदाचं पर्व स्थगित करण्यात आलं होतं. पण ते आता यूएईमध्ये पूर्ण केलं जात आहे. कोरोनामुळे जगभरातील अनेक गोष्टी बदलल्या. यात क्रिकेटमध्येही बरेच बदल झाले. आयसीसीनं खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देत अनेक निर्बंध लादले आणि नवे नियम लागू केले. मग ते चेंडूवर थुंकी लावण्यास बंदी असो किंवा मग स्पर्धेत खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहण्याची सक्ती असे कठोर निर्बंधांमध्ये खेळाडूंना खेळावं लागत आहे. 

एबी डी'व्हिलियर्सला बाद होताना पाहून त्याच्या मुलाचा संताप, Video व्हायरल...

बायो-बबलमुळे खेळाडूंना आपल्या कुटुंबीयांपासूनही बराच काळ दूर राहावं लागत आहे. बायो-बबलचे नियम म्हणजे एकाप्रकारे विलगीकरणात राहण्यासारखंच आहे. त्यामुळे तुमचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. सध्या आयपीएलमध्येही खेळाडू बायो-बबलच्या नियमांचं पालन करत आहेत. याच मुद्द्यावर पंजाब किंग्जचा वेगवान गोंलदाज मोहम्मद शमी यानं नाराजी व्यक्त केली आहे. मोहम्मद शमी गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्या कुटुंबीयांपासून दूर आहे. तो इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघात सहभागी होता. जूनमध्ये भारत इंग्लंड दौऱ्यावर होता. तेव्हापासून शमी कुटुंबीयांपासून दूर आहे. 

धोनीच्या CSK संघाला कसं पराभूत करता येईल? सेहवागनं दिला 'कानमंत्र'!

आयपीएनंतर लगेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यासाठीही खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावं लागणार आहे. मोहम्मद शमीनं आता बायो-बबलमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. "सध्या आमच्यासमोर सर्वात मोठी अडचण म्हणजे परदेशात जाणं हिच आहे. परदेशात जाऊन तुम्हाला बायो-बबलच्या नियमांचं पालन करावं लागतं. जर दौरा मोठा असेल तर तुम्ही कुटुंबीयांपासून बराच काळ दूर राहता. हे मानसिकरित्या खूप त्रास देणारं आहे. तुम्हाला एकाच खोलीत कोंडल्यासारखं राहावं लागतं. त्यानंतर तुम्हाला देशासाठी किंवा तुमच्या फ्रँचायझीसाठी चांगली कामगिरी करण्याचा दबावही तुमच्यावर असतो", असं मोहम्मद शमी म्हणाला. 

भारतीय ट्वेन्टी-२० संघात चहलला जागा न दिल्यानं सेहवाग संतापला, म्हणाला...'स्पष्टीकरण द्या!'

मोहम्मद शमीनं यावेळी फिटनेसवरही भाष्य केलं. सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं तो म्हणाला. "माझं शरीर एकंदर मला खूप चांगली साथ देत आहे. ऑस्ट्रेलियात चेंडू लागण्यानं मी दुखापतग्रस्त झालो होतो. ती घटना घडली नसती तर मी आज आणखी चांगल्या स्थितीत असतो. फक्त एक गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ती म्हणजे तुम्ही तुमच्या दुखापतीवर कशी मात करता? तुम्हाला आराम हवाय, मसाज हवा, उपचार हवेत हे तुमचं तुम्हाला कळायला आणि ठरवायला हवं. स्वत: शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं झालं आहे", असं शमी म्हणाला. सध्या आपण रिकव्हरी मोडवर असल्याचंही तो म्हणाला. जेव्हा मी मैदानात नसतो तेव्हा मी एनर्जी वाया जाणार नाही याची काळजी घेत. योग्य तितका वेळ शरिराला आराम देतो आणि मैदानात उतरताच १०० टक्के झोकून देऊन कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असतो, असंही तो म्हणाला. 

Web Title: IPL 2021 Mohammed shami said bio bubble can be irritating and players get mentally disturbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.