Join us  

IPL 2021 : भारतातून येणाऱ्या प्रवाशांना मालदीवमध्ये प्रवेशबंदी; चेन्नई सुपर किंग्सचं वाढलं टेंशन 

भारतासह दक्षिण आशियातून येणाऱ्या प्रवाशांवर मालदीवनं तात्पुरती बंदी घातली आहे. आयपीएलचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, स्टाफ सदस्य, अम्पायर्स व समालोचक असे जवळपास ४० जणं मालदीवला दाखल झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 3:17 PM

Open in App

IPL 2021 suspended: भारतासह दक्षिण आशियातून येणाऱ्या प्रवाशांवर मालदीवनं तात्पुरती बंदी घातली आहे. आयपीएलचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, स्टाफ सदस्य, अम्पायर्स व समालोचक असे जवळपास ४० जणं मालदीवला दाखल झाले. ऑस्ट्रेलियानं १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्यानं ऑसी खेळाडूंना मालदीवचा आसरा घ्यावा लागला. १६ मे ला ते मालदीवहून ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील. पण, आता मालदीवनेही भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातल्यानं चेन्नई सुपर किंग्सचं ( Chennai Super Kings) टेंशन वाढलं आहे. CSKचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हस्सी ( Michael Hussey) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याला चेन्नईत उपचारासाठी थांबावे लागले. प्रकृती सुधारल्यानंतर तो मालदीवमार्गे ऑस्ट्रेलियात जाणार होता, परंतु तोही मार्ग बंद झाला आहे. टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूच्या घरी कोरोनाचा शिरकाव, आई-वडिलांना झालाय कोरोना!

आयपीएल स्थगित झाल्यानंतर हस्सीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला चेन्नईला एअऱलिफ्ट करण्यात आले आणि आता त्याची प्रकृती सुधारत आहे. मालदीवमध्ये असणाऱ्या ऑसी खेळाडूंसोबतच तो मायदेशात परतणार होता आणि त्यासाठी तो मालदीवला रवाना होणे अपेक्षित होतं. पण, तो आता भारतातच अडकला आहे. भारत सोडण्यापूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट तीनवेळा निगेटिव्ह येणं गरजेचं आहे. हस्सीची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, परंतु दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यामुळे त्याला पुन्हा आयसोलेशनमध्ये जावे लागले आहे. भारतीय खेळाडूंनी लक्ष विचलित केलं, म्हणून आम्ही हरलो; लाजीरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचा अजब दावा

चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, आज हस्सीची टेस्ट होईल आणि काय रिपोर्ट येतो त्यानंतर निर्णय घेतला जाईल. सध्या हस्सीची प्रकृती सुधारणे हे महत्त्वाचे आहे. तो बरा होतोय. मालदीवसाठी प्रवासबंदी असेल तर तो जाऊ शकत नाही. पण, याबाबत भाष्य करणे घाईचे होईल. प्रथम त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे.''   पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह इरफान पठाणनं केला निषेध; म्हणाला, हल्ल्याचे समर्थन करता येणार नाही!

आयपीएल २०२१मधील ऑस्ट्रेलियन खेळाडूग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, झाय रिचर्डसन, मार्कस स्टॉयनिस, स्टीव्ह स्मिथ, रिली मेरेडीथ, नॅथन कोल्टर-नील, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, डॅन ख्रिस्टियन, ख्रिस लीन, बेन कटिंग, जेसन बेहरेनडॉर्फ, मोईजेस हेन्रीक्स ( Australian cricketers in IPL 2021: Glenn Maxwell (RCB), Pat Cummins (KKR), David Warner (SRH), Jhye Richardson (PBKS), Marcus Stoinis (DC), Steve Smith (DC), Riley Meredith (PBKS), Nathan Coulter-Nile (MI), Kane Richardson (RCB), Daniel Sams (RCB), Dan Christian (RCB), Chris Lynn (MI), Ben Cutting (SRH), Jason Behrendorff (CSK), Moises Henriques (PBKS). 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्समालदीव