Join us  

IPL 2021 : गंभीर युगात परतण्यास कोलकाता नाईट रायडर्स उत्सुक

Kolkata Knight Riders : गौतम गंभीर संघातून गेल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) कामगिरीचा आलेख खालवत गेला; पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दोन वेळचा चॅम्पियन संघ ९ एप्रिलपासून प्रारंभ होणाऱ्या स्पर्धेत योग्य संयोजन तयार करीत हरविलेला सूर शोधण्यासाठी प्रयत्नशील असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 4:55 AM

Open in App

कोलकाता : गौतम गंभीर संघातून गेल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) कामगिरीचा आलेख खालवत गेला; पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दोन वेळचा चॅम्पियन संघ ९ एप्रिलपासून प्रारंभ होणाऱ्या स्पर्धेत योग्य संयोजन तयार करीत हरविलेला सूर शोधण्यासाठी प्रयत्नशील असेल.यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या स्पर्धेत सलामी जोडीसह मधली फळी व फिनिशरपर्यंत केकेआर संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. स्पर्धेदरम्यान कर्णधारही बदलण्यात आला; पण कुठला परिणाम झाला नाही.वेस्ट इंडीजचे दोन स्टार खेळाडू आंद्रे रसेल व सुनील नारायण अपयशी ठरल्यामुळे केकेआर गंभीर युगानंतर सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरला. केकेआरची यंदाच्या मोसमाची सुरुवात ११ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेन्नईमध्ये होणार आहे. संघ यापूर्वीच्या उणिवा दूर करीत नव्याने सुरुवात करण्यास उत्सुक आहे. मॉर्गनने स्वत: चांगली कामगिरी करताना १४ डावांमध्ये ४१८ धावा फटकावल्या होत्या. त्याने डेथ ओव्हर्समध्ये मोठे फटके खेळण्याच्या आपल्या कौशल्याचा चांगला वापर करताना सर्वाधिक २४ षटकार लगावले होते.केकेआरने निराशाजनक कामगिरीनंतरही १७ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे; पण यावेळी काही चांगल्या खेळाडूंनाही संघात स्थान दिले आहे. बांगला देशचा स्टार अष्टपैलू शाकिब-अल-हसन व बेन कटिंग यांच्या समावेशामुळे नारायण व रसेल यांचे चांगले बॅकअप मिळाले आहे. केकेआरकडे प्रसिद्ध कृष्णाच्या रूपाने चांगला युवा वेगवान गोलंदाज आहे; पण पुन्हा एकदा नजर ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार पॅट कमिन्सवर राहील. त्याची साथ देण्यासाठी संघात लॉकी फर्ग्युसन आहे.दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडताना आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. तो २०२० चे अपयश २०२१ मध्ये भरून काढण्यास उत्सुक असेल. शाकिब व अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंगसुद्धा दिल्ली व चेन्नईतील संथ खेळपट्ट्यांचा लाभ घेण्यास उत्सुक असतील. केकेआरला शुभमन गिलकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. गिलने गेल्या वर्षी सुरुवातीला जास्त चेंडू वाया घालविले होते. त्यामुळे मधल्या फळीवर दडपण आले होते. मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघाला सुरुवातीपासून चांगले संयोजन तयार करावे लागले; कारण गेल्या वर्षी संघ त्यात अपयशी ठरला होता. केकेआर संघ : इयोन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिंस, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर आणि पवन नेगी. मॉर्गन पूर्ण स्पर्धेत करणार संघाचे नेतृत्वइयोन मॉर्गन प्रथम पूर्ण स्पर्धेत केकेआरचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे यावेळी केकेआरकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार असेल. इंग्लंडच्या विश्वकप विजेत्या कर्णधाराने गेल्या वर्षी स्पर्धेदरम्यान कर्णधारपदाची धुरा स्वीकारली होती. फिरकीची बाजू कमकुवत  केकेआरची कमकुवत बाजू फिरकी गोलंदाजी आहे. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला गेल्या वर्षी पाच सामन्यांत केवळ एक बळी घेता आला.  गंभीरच्या नेतृत्वाखाली २०१२ व २०१४ मध्ये जेतेपदाचा हिरो ठरलेला नारायणही अपयशी ठरला. गेल्या वर्षी नारायणला संशयास्पद शैलीसाठी ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे त्याला चार सामन्यांत खेळता आले नव्हते.   एक आणखी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने नारायणच्या अनुपस्थितीत जबाबदारी सांभाळताना १७ बळी घेतले होते; पण त्याचा फिटनेस चिंतेचा विषय आहे. 

टॅग्स :आयपीएलकोलकाता नाईट रायडर्स