Join us  

IPL 2021, KKR vs SRH T20 Live : KKRची मोठी खेळी, ४० वर्षीय खेळाडूला पदार्पणाची संधी; SRHनं नाणेफेक जिंकली

IPL 2021 : KKR vs SRH  T20 Live Score Update : माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघानं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ( Sunrisers Hyderabad) मोठा डाव टाकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 7:04 PM

Open in App

IPL 2021 : KKR vs SRH  T20 Live Score Update : माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघानं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ( Sunrisers Hyderabad) मोठा डाव टाकला. डेव्हिड वॉर्नरचा झंझावात रोखण्यासाठी KKRनं ४० वर्षीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याला पदार्पणाची संधी दिली. आयपीएल २०२१च्या लिलावात KKRनं २ कोटींच्या मुळ किंमतीत भज्जीला आपल्या ताफ्यात घेतले होते आणि पहिल्याच सामन्यात अनुभवी खेळाडूला मैदानावर उतरवण्याचा डाव कर्णधार इयॉन मॉर्गननं खेळला आहे. भज्जीच्या नावावर आयपीएलमध्ये १६० सामन्यांत १५० विकेट्स आहेत. IPL 2021 : KKR vs SRH  T20 Live Score Update

सनरायझर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. SRH won the toss and elected to field first. 

आयपीएलचे जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तीनही संघाकडून खेळणारा हरभजन सिंग हा पहिलाच खेळाडू ठरला. आयपीएल २०१९च्या अंतिम सामन्यानंतर भज्जी पहिला ट्वेंटी-२० सामना खेळत आहे. ६९९ दिवसांनी तो मैदानावर उतरला आहे. KKR vs SHR सामन्यांत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६१६ धावा केल्या आहेत आणि भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक १९ विकेट घेतल्या आहेत. कोलकाताकडून शुबमन गिल यानं हैदराबादविरुद्ध सर्वाधिक ४४० धावा केल्या आहेत तर कुलदीप यादव आणि सुनील नरेन यांनी सर्वाधिक १० बळी घेतले आहेत. यावरून हॉलंड हीनं राशिदच्या एका पोस्टवर कमेंट केली. उद्याच्या सामन्यासाठी तयार आहे. IPL 2021 KKR vs SRH Live T20 Score 

Head To Head 

  • आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दोन्ही संघांमधील हा २० वा सामना असेल. आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत १९ वेळा एकमेकांना भिडले आहेत. यात केकेआरची बाजू उजवी ठरली आहे. कोलकात्याने १२ सामने जिंकले आहेत तर हैदराबादने केवळ ७ सामने जिंकले आहेत. 
  • भारतात झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता आणि हैदराबाद आयपीएलच्या १७ सामन्यांमध्ये आमने सामने आले आहेत. यापैकी ७ सामन्यांमध्ये हैदराबादने विजय मिळवला आहे, तर १० सामन्यांमध्ये कोलकात्याने विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात दोन्ही संघ एकमेकांना दोनदा भिडले आणि दोन्ही वेळेस केकेआरने हैदराबादला पराभूत केलं आहे.IPL 2021 KKR vs SRH  
  • Playing XI
  • SRH परदेशी खेळाडू - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, राशिद खान
  • KKR परदेशी खेळाडू - पॅट कमिन्स, आंद्रे रसेल, इयॉन मॉर्गन, शाकिब अल हसन
  • Sunrisers Hyderabad : डेव्हिड वॉर्नर, वृद्धीमान सहा, मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, मोहम्मद नबी, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, टी नटराजन
  • Kolkata Knight Riders: शुबमन 
टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादहरभजन सिंग