Join us  

IPL 2021 KKR vs RCB: मेन विल बी मेन! जेमिन्सन जिच्याकडे पाहत होता, 'ती' तरुणी नेमकी आहे तरी कोण?

IPL 2021 KKR vs RCB: संघ संकटात, ४ बाद ५३ धावा अन् जेमिन्सन भलतीच मॅच खेळतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 3:18 PM

Open in App

आयपीएल २०२१ च्या पहिल्या सत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सनं (केकेआर) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विराटचा संघ २० षटकंदेखील खेळू शकला नाही. अवघ्या ९२ धावांमध्ये आरसीबीचा खुर्दा उडाला. त्यानंतर केकेआरनं हे आव्हान अवघ्या १० षटकांमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात पार करत सहज विजय मिळवला.

आरसीबीच्या फलंदाजांनी कोलकात्याविरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. कर्णधार विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स यांना चमक न दाखवता आल्यानं आरसीबीची फलंदाजी कोसळली. आरसीबीच्या एकाही खेळाडूला काल चांगला खेळ करता आला नाही. मात्र संघाची फलंदाजी कोसळत असताना एका खेळाडूनं मात्र लक्ष वेधून घेतलं. ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

कोहली, डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर बंगळुरुचा संघ ४ बाद ५३ अशा अडचणीत होता. दहावं षटक सुरू असताना कॅमेरा बंगळुरूच्या डगआऊटकडे फिरवण्यात आला. त्यावेळी आरसीबीचा कायले जेमिन्सन पॅड बांधून बसला होता. आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याच्या तयारीत जेमिन्सन बसला असताना कॅमेरा त्याच्यावर फोकस झाला. त्यावेळी जेमिन्सन त्याच्या उजवीकडे मागच्या बाजूस बसलेल्या तरुणीकडे बसून स्माईल करत होता.

जेमिन्सनच्या मागच्या बाजूस बसून त्याला स्माईल देणाऱ्या तरुणीचं नाव नवनिता गौतम. ती बंगळुरू संघाची मसाज थेरेपिस्ट आहे. जेमिन्सन आणि नवनिता एकमेकांकडे पाहून स्माईल करत असल्याचं कॅमेऱ्यानं टिपलं. त्यानंतर लगेच त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या. 'मेन विल बी मेन', 'आग लगे बस्ती में, हम तो अपनी मस्ती में', 'संघ ४ बाद ५३, पण जेमिन्सनची वेगळीच मॅच सुरूय', अशा स्वरुपाच्या प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावर पडला आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सएबी डिव्हिलियर्सविराट कोहली
Open in App