Join us  

IPL 2021, KKR vs DC T20 : शिखर धवन अन् दिनेश कार्तिक यांच्यात सामना सुरू असतानाच रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, Video

IPL 2021, KKR vs DC T20 : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं एकट्यानं कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:55 PM

Open in App

IPL 2021, KKR vs DC T20 : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं एकट्यानं कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या.  पृथ्वीनं फटकेबाजी कायम राखताना दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) चा विजय पक्का केला. त्यानं शिखर धवनसोबत पहिल्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी करताना ४१ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. या सामन्यात शिखर धवनदिनेश कार्तिक यांच्यात रंगलेल्या हाय-व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  सहा चेंडूंत सहा चौकार; KKRचा गोलंदाज शिवम मावी यानं पडकली पृथ्वी शॉची मान, Video Viral

आज शुबमन गिल फॉर्मात आला पण, अन्य फलंदाजांनी माना टाकल्या. नितीश राणा ( १५), राहुल त्रिपाठी ( १९) , कर्णधार इयॉन मॉर्गन ( ०) व सुनील नरीन ( ०) हे फलंदाज अपयशी ठरले. शुबमन गिलनं ३८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. आंद्रे रसेल २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. त्यानं KKRला २० षटकांत ६  बाद १५४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. जबरदस्त, खणखणीत...! पृथ्वी शॉ सॉलिड खेळला; जलद अर्धशतक नोंदवत दिल्लीला सहज विजय मिळवून दिला 

पृथ्वीनं पहिल्याच षटकात धमाका उडवली. शिवम मावीच्या त्या षटकात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं सहा चेंडूंत सलग सहा चौकार खेचले. पहिल्या षटकात सर्वाधिक २४ धावांचा विक्रमही पृथ्वीनं नावावर केला. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.  धावांचा पाठलाग करतानाही असा पराक्रम कोणत्याच फलंदाजानं केला नव्हता. याआधी अजिंक्य रहाणेनं २०१२मध्ये एका षटकात सलग सहा चौकार खेचले होते. दिल्लीच्या इतर फलंदाजांना केवळ विजयाचे सोपस्कार पार पाडायचे होते. दिल्लीनं १६.३ षटकांत ३ बाद १५६ धावा करताना विजय पक्का केला. Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव' मदतीला धावला; 'मिशन ऑक्सिजन'साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!

शिखर - दिनेश मध्ये नेमके काय घडले? पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल २०२१शिखर धवनदिनेश कार्तिककोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स