Join us  

IPL 2021, KKR vs DC T20 : सहा चेंडूंत सहा चौकार; KKRचा गोलंदाज शिवम मावी यानं पडकली पृथ्वी शॉची मान, Video Viral

IPL 2021, KKR vs DC T20 : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पृथ्वीच्या नेतृत्वाखाली शिवम मावी खेळला होता आणि आज त्याची धुलाई झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:28 PM

Open in App

IPL 2021, KKR vs DC T20 : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं एकट्यानं कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. पृथ्वीनं पहिल्या षटकातच सॉलिड सुरूवात केली आणि शिवम मावीला सहा चेंडूंत सहा चौकार खेचले... पृथ्वीनं ही फटकेबाजी कायम राखताना दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) चा विजय पक्का केला. त्यानं शिखर धवनसोबत पहिल्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी करताना ४१ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. शिवम मावीनं  या सामन्यानंतर पृथ्वी शॉची मान पकडली अन् त्याचा हात मुरगळला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जबरदस्त, खणखणीत...! पृथ्वी शॉ सॉलिड खेळला; जलद अर्धशतक नोंदवत दिल्लीला सहज विजय मिळवून दिला 

आज शुबमन गिल फॉर्मात आला पण, अन्य फलंदाजांनी माना टाकल्या. नितीश राणा ( १५), राहुल त्रिपाठी ( १९) , कर्णधार इयॉन मॉर्गन ( ०) व सुनील नरीन ( ०) हे फलंदाज अपयशी ठरले. शुबमन गिलनं ३८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. आंद्रे रसेल पुन्हा संकटमोचकाच्या भूमिकेत होता आणि त्यानं त्याची जबाबदारी चोख पार पाडली. त्यानं KKRला २० षटकांत ६  बाद १५४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. आंद्रे रसेल २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला.  अमित मिश्रासारखा अनुभवी व फॉर्मात असलेला गोलंदाज दुखापतीमुळे बाकावर बसल्यानंतर कोणत्याची संघाची गोलंदाजीची बाजू डळमळली असती. पण, अक्षर पटेल व ललित यादव यांनी डावच पालटला. ललितनं KKRच्या दोन मोठ्या फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही. 

पृथ्वीनं पहिल्याच षटकात धमाका उडवली. शिवम मावीच्या त्या षटकात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं सहा चेंडूंत सलग सहा चौकार खेचले. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.  धावांचा पाठलाग करतानाही असा पराक्रम कोणत्याच फलंदाजानं केला नव्हता. याआधी अजिंक्य रहाणेनं २०१२मध्ये एका षटकात सलग सहा चौकार खेचले होते. पहिल्या षटकात सर्वाधिक २४ धावांचा विक्रमही पृथ्वीनं नावावर केला. दिल्लीच्या इतर फलंदाजांना केवळ विजयाचे सोपस्कार पार पाडायचे होते. दिल्लीनं १६.३ षटकांत ३ बाद १५६ धावा करताना विजय पक्का केला. Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव' मदतीला धावला; 'मिशन ऑक्सिजन'साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!

सामन्यानंतर काय घडले? 

टॅग्स :आयपीएल २०२१पृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स