Join us  

IPL 2021, KKR vs DC T20 Match Highlights : पृथ्वी शॉनं पहिल्या षटकातच जिंकला सामना, KKRच्या गोलंदाजांचे खच्चीकरण!

IPL 2021, KKR vs DC T20 Match Highlights : आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, सुनील नरीन हे सर्व दिग्गज एका बाजूला अन् दुसऱ्या बाजूला एकटा पृथ्वी शॉ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:13 PM

Open in App

IPL 2021, KKR vs DC T20 Match Highlights : आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, सुनील नरीन हे सर्व दिग्गज एका बाजूला अन् दुसऱ्या बाजूला एकटा पृथ्वी शॉ... कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांच्यातल्या सामन्यात शिखर धवननं ( Shikhar Dhawan) हा सहाय्यक नायकाची भूमिका चोख बजावली. १५४ धावांचा पाठलाग करताना पृथ्वीनं पहिल्या षटकातच खणखणीत सहा चौकार खेचून २४ धावा कुटल्या, तिथेच KKRचा पराभव अटळ झाला होता. पृथ्वीच्या त्या प्रहारानं KKRच्या गोलदाजांचं खच्चीकरण केलं अन् DCनं अर्धी लढाई जिंकली. पुढे उरली फक्त विजयाची औपचारिकता...

IPL 2021, KKR vs DC T20 Match Highlights : 

  • आज शुबमन गिल फॉर्मात आला पण, अन्य फलंदाजांनी माना टाकल्या. नितीश राणा ( १५), राहुल त्रिपाठी ( १९) , कर्णधार इयॉन मॉर्गन ( ०) व सुनील नरीन ( ०) हे फलंदाज अपयशी ठरले. शुबमन गिलनं ३८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. 
  • आंद्रे रसेल पुन्हा संकटमोचकाच्या भूमिकेत होता आणि त्यानं त्याची जबाबदारी चोख पार पाडली. त्यानं KKRला २० षटकांत ६  बाद १५४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. आंद्रे रसेल २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. पॅट कमिन्सनं ११ धावा केल्या. 
  • अमित मिश्रासारखा अनुभवी व फॉर्मात असलेला गोलंदाज दुखापतीमुळे बाकावर बसल्यानंतर कोणत्याची संघाची गोलंदाजीची बाजू डळमळली असती. पण, अक्षर पटेल व ललित यादव यांनी डावच पालटला. ललितनं KKRच्या दोन मोठ्या फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नाही.
  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर संघाबाहेर केला गेलेल्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी कोणतीच कसर सोडताना दिसत नाही. विजय हजारे ट्रॉफीत ८००+ धावा करणारा पहिला भारतीय फलंदाजाचा मान पटकावून इतिहास रचणाऱ्या पृथ्वीनं आज कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) गोलंदाजांची धुलाई केली.
  • पृथ्वीनं पहिल्याच षटकात धमाका उडवली. शिवम मावीच्या त्या षटकात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं सहा चेंडूंत सलग सहा चौकार खेचले. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. 
  • धावांचा पाठलाग करतानाही असा पराक्रम कोणत्याच फलंदाजानं केला नव्हता. याआधी अजिंक्य रहाणेनं २०१२मध्ये एका षटकात सलग सहा चौकार खेचले होते. पहिल्या षटकात सर्वाधिक २४ धावांचा विक्रमही पृथ्वीनं नावावर केला. 
  • पृथ्वीनं ४१ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. पृथ्वी KKRच्या गोलंदाजीची कत्तल करत असताना शिखर धवन संयमानं त्याची साथ देत होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३२ धावा जोडल्या. मग दिल्लीच्या इतर फलंदाजांना केवळ विजयाचे सोपस्कार पार पाडायचे होते.  दिल्लीनं १६.३  षटकांत ३ बाद १५६ धावा करताना विजय पक्का केला. 

 

टॅग्स :आयपीएल ट्वेंटी-20 मॅच हायलाईट्सआयपीएल २०२१पृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्स