Join us  

Video : स्कूप मारायला गेला अन् खेळपट्टीवर आडवा झाला; स्टीव्ह स्मिथवर आली 'वाईट' वेळ!

IPL 2021, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Update : कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) आणि  दिल्ली कॅपिटल्स ( DC) यांच्यातल्या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 6:25 PM

Open in App

IPL 2021, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Update : कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) आणि  दिल्ली कॅपिटल्स ( DC) यांच्यातल्या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. रिषभ पंतनं फिरवलेल्या बॅटवर दिनेश कार्तिक थोडक्यात वाचला, आर अश्विननं स्ट्राईकवडून KKRच्या खेळाडूंसोबत राडा घातला. त्यात IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात पहिलाच सामना खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथवर ( Steve Smith) खेळपट्टीवर आडवं होण्याची पाळी आली. त्यानंतर तो फलंदाजीला उभा राहिला खरा, परंतु त्याला माघारी जावं लागलं. 

कोलकातानं नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीला बोलावलं. पृथ्वी शॉ जखमी झाल्यामुळे आजच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ सलामीला आला. त्यानं आणि शिखर धवन यांना दिल्लीसाठी आश्वासक सुरूवात करता आली नाही. आयपीएल २०२१मधील ऑरेंज कॅपधारक धवन २४ धावांवर ल्युकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस अय्यर ( १), शिमरोन हेटमायर ( ४), ललित यादव ( ०), अक्षर पटेल ( ०) व आर अश्विन ( ९) यांना झटपट माघारी पाठवून कोलकातानं सामन्यावर मजबूत पकड घेतली. स्टीव्ह स्मिथ ( ३९) व रिषभ पंत ( ३९) यांनी किंचितसा संघर्ष केला, परंतु मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले. फर्ग्युसन, सुनील नरीन व वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

दिल्लीच्या ९ बाद १२७ धावांच्या प्रत्युत्तरात कोलकातानं ९ षटकांत २ बाद ६५ धावा केल्या आहेत. दिल्लीच्या डावातील १३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हास्यास्पद प्रसंग घडला. फर्ग्युसनच्या फुलटॉसवर स्कूप मारण्याचा स्मिथनं प्रयत्न केला, परंतु तो चेंडू त्याच्या बॅटलला लागून 'अवघड' जागी लागला आणि वेदनेनं स्मिथ कळवळला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. 

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :आयपीएल २०२१स्टीव्हन स्मिथदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App