Join us  

IPL 2021: एक ही मारा, पर सॉलिड मारा; सुनील नरेननं नोंदवला अनोखा विक्रम

IPL 2021: सुनील नरेनने धावांवर अंकुश ठेवताना केवळ एक बळी घेतला. मात्र, त्याने घेतलेला हा बळी आयपीएलमधील विक्रमी ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 1:12 PM

Open in App

अबुधाबी : गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पुन्हा एकदा एकतर्फी विजय मिळवताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ७ गड्यांनी नमवले. विशेष म्हणजे युवा वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर केकेआरचा विजय सोपा झाला असला तरी सामनावीर ठरला तो, स्टार फिरकीपटू सुनील नरेन. नरेनने धावांवर अंकुश ठेवताना केवळ एक बळी घेतला. मात्र, त्याने घेतलेला हा बळी आयपीएलमधील विक्रमी ठरला.

हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा

नाणेफेक जिंकून कोलकाताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पॉवर प्लेमध्ये फिरकीपटूंना गोलंदाजी दिली. मात्र, हा निर्णय चुकीच ठरला. कारण मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा फिरकी गोलंदाजीवर तुटून पडला होता. त्याने नितिश राणा, वरुण चक्रवर्ती यांचा जबरदस्त समाचार घेतला. यामुळे मुंबईने पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरुवात केली होती.

KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा Video

परंतु, मुंबईच्या वेगवान धावगतीला ब्रेक मारला तो सुनील नरेनने. त्याने ४ षटकांमध्ये फक्त २० धावा देताना एक बळी मिळवला. हा बळी होता रोहित शर्माचा. त्यामुळेच त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. यासह नरेनने विशेष विक्रमही नोंदवला. नरेनने आयपीएलमध्ये रोहितला तब्बल सातव्यांदा बाद केले आहे. आयपीएलमध्ये एकाच फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याच्या विक्रमाची त्याने यावेळी बरोबरी केली.

एकाच फलंदाजाला आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम याआधी झहीर खान आणि संदीप शर्मा या वेगवान गोलंदाजांच्या नावावर होता. आता नरेननेही या दोघांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. झहीरने महेंद्रसिंग धोनीला ७ वेळा तंबूत पाठवले असून संदीपने विराट कोहलीला ७ वेळा बाद केले आहे. त्यामुळेच भलेही नरेनने मुंबईविरुद्ध एकच बळी घेतला असेल, पण म्हणतात ना, ‘एक ही मारा, पर सॉलिड मारा!’ असेच काहीसे नरेनने केले आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सरोहित शर्मा
Open in App