Join us  

IPL 2021: डॅन ख्रिश्चन कसा ठरतोय आरसीबीसाठी 'लकी चार्म'? 

राॕयल चॕलेंजर्स बंगलोरच्या (RCB)  संघात एक अष्टपैलू आॕस्ट्रेलियन (Australia)  खेळाडू आहे डॕन ख्रिश्चन (Dan Christian)

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 1:46 PM

Open in App

-ललित झांबरे

राॕयल चॕलेंजर्स बंगलोरच्या (RCB)  संघात एक अष्टपैलू आॕस्ट्रेलियन (Australia)  खेळाडू आहे डॕन ख्रिश्चन (Dan Christian) . ह्या खेळाडूने फार काही धडाकेबाज कामगिरी केलेली नसली तरी तो त्याच्या आधीच्या इतिहासाप्रमाणे आरसीबीसाठीही आतापर्यंत तरी यंदा लकी चार्म (Lucky Charm) ठरत आहे. 

... कारण डॕन ख्रिश्चनने यंदा आरसीबीसाठी जेवढे सामने खेळलेय त्यापैकी एक सामना वगळता आरसीबीने बाकीचे सामने जिंकले आहेत. म्हणून डॕन ख्रिश्चन हा संघात असला की आरसीबीचा संघ सामना जिंकत आलाय म्हणून कोहलीने त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये कायम ठेवावे असे आता क्रिकेटप्रेमी म्हणू लागले आहेत. 

मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुध्दच्या पहिल्या सामन्यात डॕन ख्रिश्चनला आरसीबीने खेळवले. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द तो बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता. यापैकी चेन्नईविरुध्दचा सामना वगळता आरसीबीने इतर सामने जिंकले आहेत. त्यामुळे डॕन ख्रिश्चन ह्याची आता आरसीबीसाठी लकी चार्म अशी ओळख झाली आहे. 

यंदाच्या आयपीएलसाठी आरसीबीच्या तंबूत परतण्याआधी डॕन ख्रिश्चन ज्या ज्या टी-20 लीग स्पर्धा खेळलाय त्या स्पर्धा त्याच्या संघाने जिंकल्या आहेत. बिग बॕग लिगची चार, टी-20 ब्लास्टची दोन, साऊथ आफ्रिका सुपर लीग, कॕरिबियन प्रिमीयर लिगआणि इंग्लंडमधील  टी-20 लिग यांचे प्रत्येकी एक विजेतेपद त्याच्या नावावर आहे. हॕम्पशायर, साऊथ आॕस्ट्रेलिया, ब्रिस्बेन हिट, नाॕटींघमशायर, त्रिन्बागो नाईट रायडर्स, जोझी स्टार्स, रेनेगेडस् आणि सिडनी सिक्सर्स या संघांसाठी तो यशस्वी ठरला आहे. 

VIDEO: चहलनं ड्रेसिंग रुममध्ये 'कॉपी' केली मॅक्सवेलनं टिपलेल्या झेलची 'स्टाईल', 'असं' झालं सेलिब्रेशन!

आयपीएलमध्ये मात्र चार मोसमात त्याच्या हाती यश लागलेले नाही. डेक्कन चार्जर्स, राॕयल चॕलेंजर्स बंगलोर, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटस् यांच्यासाठी तो खेळलाय पण त्याच्या ह्या संघांना तो संघात असताना यश मिळालेले नाही. त्यामुळे जगभर चालेलेले त्याचे लक आतापर्यंत आयपीएलमध्ये तरी फेल गेलेले आहे पण आता यंदा आरसीबीसाठी तो लकी ठरतौय. 10 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह ते तिसऱ्या स्थानी आहेत आणि म्हाणूनच आता आयपीएलमध्येही डॕनचे लक जादू करेल का, याची उत्सुकता वाढली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App