Join us  

IPL Final, CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या निर्णयानं चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात धडकी, आकडेवारी पाहून चिंतेत

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) या संघांमध्ये आयपीएल २०२१ची फायनल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 7:04 PM

Open in App

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) या संघांमध्ये आयपीएल २०२१ची फायनल होत आहे. आयपीएलच्या या पर्वाला सुरुवात झाल्यानंतर हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, अनहोनी को होनी करतो धोनी, असंच म्हणावं लागेल. IPL 2020मध्ये सर्वात आधी बाद होणारा संघ, तर IPL 2021मध्ये सर्वप्रथम प्ले ऑफचे तिकीट पटकावणारा संघ, हा CSKचा प्रवास सर्वांना अचंबित करणारा आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली KKRनंही फिनिक्स भरारी मारली आणि जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या एकेक संघाला त्यांनी बाजूला काढलं. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

IPL 2021 FINAL, DUBAI - महेंद्रसिंग धोनीची ही १४व्या पर्वातील १०वी आयपीएल फायनल आहे. त्यानं पाच आयपीएल फायनल मुंबई इंडियन्सविरुद्ध, १ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध, १ सनरायझर्स हैदराबाद आणि १ राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळली आहे. आज तो कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध फायनल खेळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा आयपीएल फायनल खेळत आहे आणि यापूर्वी दोन्ही वेळेस त्यांनी जेतेपद पटकावले आहे. दोन्ही वेळेस त्यांनी १९०+ धावांचा पाठलाग करून बाजी मारली. आज CSK चौथं, तर KKR तिसरं जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. कोलकातानं एकदाही फायनल गमावलेली नाही, त्यामुळे CSKसाठी ही फायनल तितकी सोपी नक्की नसेल.

  • कोलकाता नाइट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईनं आजच्या सामन्यातही सुरेश रैनाला बाकावर बसवले, तर कोलकातानंही आंद्रे रसेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही.

 

  • रवींद्र जडेजा आज २०० वा आणि फॅफ ड्यू प्लेसिस १००वा आयपीएल सामना खेळणार आहे. ही दोघंही चेन्नई सुपर किंग्सचे महत्त्वाचे शिलेदार आहेत.  
  • दुबईमध्ये झालेल्या मागील ९ सामन्यांपैकी ८ सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं जिंकली आहेत. कोलकाता नाइट रायडर्सनं  आयपीएल २०२१त यूएईत ९पैकी ७ सामने जिंकले, परंतु चेन्नईकडून त्यांना हार मानावी लागली.   
  • सुरेश रैनानं आयपीएल २०२१त १२ सामन्यांत १७.७७च्या सरासरीनं १६० धावा केल्या आहेत.  

कोलकाता नाइट रायडर्स - शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, सुनील नरीन, ल्युकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्थी, शिवम मावी, चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, रॉबीन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्समहेंद्रसिंग धोनी
Open in App